महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

विरारमध्ये पतीकडून धारदार शस्त्राने वार करत पत्नीची हत्या - पतीकडून पत्नीची हत्या

आरोपीने दारूच्या नशेत गॅलरीत टाकलेल्या कपड्यांवरून शेजाऱ्यांसोबत भांडण झाले होते. मात्र तेव्हा त्याच्याबाजूने बोलण्यासाठी घरातले कोणी आले नसल्याने आरोपीने घरात जाऊन वाद घातला. याच वादातून त्याने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला व आरडा ओरड करणाऱ्या सासूवरही त्याने वार करून फरार झाला. या घटनेत जखमी पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले होते.

विरार पोलीस
विरार पोलीस

By

Published : Sep 27, 2021, 6:56 PM IST

Updated : Sep 27, 2021, 7:08 PM IST

विरार (पालघर) - गांधी चौक परिसरात एका घर जावइने आपल्या सासूवर धारधार शस्त्राने हल्ला करत पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुप्रिया गुरव (२८) असे मृत पत्नीचे नाव असून जगदीश गुरव असे आरोपी पतीचे नाव आहे. गांधी चौक परिसरातील नरेंद्र माऊली इमारतीत हा आरोपी घरजावई म्हणून पत्नीच्या घरी राहत होता.

विरारमध्ये पतीकडून धारदार शस्त्राने वार करत पत्नीची हत्या

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे त्याच्या सासूसोबत भांडण होत असत. मात्र काल (रविवारी) रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपीने दारूच्या नशेत गॅलरीत टाकलेल्या कपड्यांवरून शेजाऱ्यांसोबत भांडण झाले होते. मात्र तेव्हा त्याच्याबाजूने बोलण्यासाठी घरातले कोणी आले नसल्याने आरोपीने घरात जाऊन वाद घातला. याच वादातून त्याने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला व आरडा ओरड करणाऱ्या सासूवरही त्याने वार करून फरार झाला. या घटनेत जखमी पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले होते. विरार पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पत्नीचा मृतदेह ताब्यात घेत आरोपी पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

हेही वाचा -अघोरी कृत्य.. वाईजवळ अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत नेऊन पूजनाचा प्रकार, मांत्रिक फरार

Last Updated : Sep 27, 2021, 7:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details