महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Gunfire Between Sand Mafia In Goa गोव्याच्या कुडचडेत वाळू माफियांमध्ये गोळीबार, एका कामगाराचा मृत्यू - वाळू माफिया

दक्षिण गोव्यातल्या कुडचडेत Kudchada South Goa रेती साठवण्याच्या मुद्द्यावरून वाळू माफियांमध्ये Sand Mafia गोळीबार Gunfire झाल्याची घटना घडली. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू Death of Worker झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात Treatment Goa Medical College जखमीवर उपचार सुरू आहेत. कुडचडे पोलीस Kudchde Police या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

goa crime
गोवा क्राईम

By

Published : Sep 1, 2022, 5:28 PM IST

पणजीऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत दक्षिण गोव्यातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण गोव्यातल्या कुडचडेत Kudchada South Goa रेती साठवण्याच्या मुद्द्यावरून वाळू माफियांमध्ये Sand Mafia गोळीबार Gunfire झाल्याची घटना घडली. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू Death of Worker झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात Treatment Goa Medical College जखमीवर उपचार सुरू आहेत. कुडचडे पोलीस Kudchde Police या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

घडलेली घटना पुढीलप्रमाणेदक्षिण गोव्यातील कुडचडे येथे वाळू साठवणूक करण्यावरून वाळू माफीयांमध्ये खडाजंगी झाली. यात एका अज्ञात इसमाने युसूफ आलम नावाच्या २३ वर्षीय कामगारावर गोळी झाडली. दरम्यान, कामगाराचा मृत्यू झाला. दुसरा कामगार मोहंमद सावि वय वर्षे ३३ हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून कुडचडे पोलीस Kudchde Police या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

गोव्याची बिहारच्या दिशेने वाटचाल - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमीत पाटकरCongress State President Amit Patkar कुडचडे मतदारसंघात वाळूमाफियांमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला. ही कुडचडे मतदारसंघासाठी अतिशय निंदनीय व क्लेशदायक बाब आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या निलेश काबराल Public Works Minister Nilesh Kabral यांच्या मतदार संघात अशी गोष्ट घडणे म्हणजे दुर्दैव आहे. अशी प्रतिक्रीया गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत CM Dr Pramod Sawant यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली.

हेही वाचा Underworld Don Dawood Ibrahim पोलिसाचा मुलगा कसा झाला अंडरवर्ल्ड डॉन वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details