बांदा (उत्तरप्रदेश):बांदा जिल्ह्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून निर्दयीपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. येथे एका महिलेवर दोन जणांनी बलात्कार केला. त्याचवेळी विरोध केल्याने तिसऱ्या व्यक्तीने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काचेची बाटली टाकली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून दोन आरोपींना अटक केली. महिलेच्या आरोपाच्या आधारे घटनास्थळावरून दोन आरोपींना अटक करण्यात आली.
असा झाला अत्याचार:पीडित महिलेने सांगितले की, ती पतीसोबत दुचाकीने गावी जात होती. त्यांच्यासोबत त्यांच्याच गावातील आणखी 3 लोक दुसऱ्या दुचाकीवरून जात होते. तेव्हा वाटेत या लोकांनी महिलेला आणि महिलेच्या पतीला दारू पाजली. दारू प्यायल्यानंतर महिलेचा पती आणि महिलेला नशा चढली. त्यानंतर त्यांनी महिलेच्या पतीला सिगारेट घेण्यासाठी पाठवले. पतीने तिला एकटी सोडल्यावर दोन लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. त्याचवेळी महिलेने विरोध केला असता तिसऱ्या व्यक्तीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काचेची बाटली घातल्याने तिला दुखापत झाली आहे.
पोलीस पोहोचले घटनास्थळी:देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्कार करून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. येथे शनिवारी रात्री उशिरा एका महिलेवर दोघांनी बलात्कार केला. त्याचवेळी विरोध करत तिसऱ्या व्यक्तीने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काचेची बाटली टाकली. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. लोकांनी पोलिसांना माहिती घटनेची दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.