सातारा - कराड तालुक्यातील पाडळी गावातील अल्पवयीन शाळकरी मुलगा मुंबईतील मीरारोडमधून बेपत्ता झाला आहे. या घटनेची मीरारोड पोलीस ठाण्यात नोंद असून फेसबुकवरील संशयास्पद चॅटींगमुळे मुलाच्या बेपत्ता प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे मीरारोड पोलीस या बेपत्ता मुलाचा शोध घेत कराडमध्ये पोहोचले आहेत. पाडळी गावातून माहिती घेऊन पोलीस मुंबईला रवाना झाले.
नातेवाईकांकडे गेलेला मुलगा बेपत्ता -कराडनजीकच्या पाडळी गावातील अल्पवयीन शाळकरी मुलगा मुंबईतील मीरारोडमध्ये राहणार्या नातेवाईकाकडे गेला होता. तेथून तो अचानक घरातून बेपत्ता झाला आहे. नातेवाईकांनी शोध घेऊनही तो सापला नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची फिर्याद मीरारोड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. मुलाचे फेसबुकवरील चॅटींग संशयास्पद आढळून आल्यानंतर डीसीपी अमित काळे, पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आहे.