नवी दिल्ली - अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्लीतील निवासस्थानी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोनमच्या घरी काम करणाऱ्या एका परिचारिकेला तिच्या पतीसह आलिशान अमृता शेरगिल मार्गावरील घरातून फेब्रुवारी महिन्यात २.४ कोटी रुपयांची रोकड आणि दागिने चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. अपर्णा रुथ विल्सन सोनमच्या सासूची काळजी घेत असते. तिचा पती पती नरेश कुमार सागर हा शकरपूर येथील एका खाजगी फर्ममध्ये अकाउंटंट आहे.
सोनमच्या घरी काम करणाऱ्या एका परिचारिकेला ( nurse working at Sonams house ) तिच्या पतीसह आलिशान अमृता शेरगिल मार्गावरील ( luxurious Amrita Shergill house ) घरातून फेब्रुवारी महिन्यात २.४ कोटी रुपयांची रोकड आणि दागिने चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली ( sonam Kapoors nurse arrest ) आहे. अटक करण्यात आलेली परिचारिका सोनमच्या सासूची देखभाल करीत होती.
ही चोरी 11 फेब्रुवारी रोजी घडली होती आणि तुघलक रोड पोलिस स्टेशनमध्ये 23 फेब्रुवारी रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील तक्रारदार सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या घराचे व्यवस्थापक होते. सोनमच्या निवासस्थानी 20 पेक्षा जास्त लोक काम करतात. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने नवी दिल्ली जिल्ह्याच्या विशेष कर्मचारी शाखेच्या पथकासह सरिता विहारमध्ये मंगळवारी रात्री छापा टाकला. त्यांनी विल्सन आणि तिचा पती या दोघांना अटक केली," चोरीचे दागिने आणि रोख रक्कम अद्याप जप्त करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.