महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Pune Crime News पुणे सातारा महामार्गावरचे सेंट्रल बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले 8 लाखांची रक्कम लंपास - Pune Crime News

पुण्यात मंगळवारी ( Pune Satara Highway ) मंगळवारी 9 ऑगस्टला पहाटे चोरट्यांनी वेळू गावच्या हद्दीतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी, गॅस कटरच्या साह्याने फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडून त्यातील 8 लाखांची रक्कम लंपास ( Robbery Amount of 8 Lakhs ) केली आहे. या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात खेड शिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये ( Rajgad Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Central Bank ATM
सेंट्रल बॅंकेचे एटीएम

By

Published : Aug 11, 2022, 6:56 AM IST

Updated : Aug 11, 2022, 2:50 PM IST

पुणे : पुणे-सातारा महामार्गवरील ( Pune Satara Highway ) वेळू गावच्या हद्दीतील ( On Border of Velu Vllage ) सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ( ATM of Central Bank of India ) एटीएम चोरट्यांनी, गॅस कटरच्या साह्याने फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडून त्यातील 8 लाखांची रक्कम लंपास ( Robbery Amount of 8 Lakhs ) केली आहे. या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात खेड शिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये ( Rajgad Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-सातारा महामार्गावर वेळू येथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक आहे. त्यांच्याच शेजारी बँकेचे एटीएम आहे.

पुणे चोरी

एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारून केली चोरी : मंगळवारी 9 ऑगस्टला पहाटे चोरट्यांनी साडेचारच्या सुमारास एटीएममध्ये प्रवेश केला. त्यानंतर एटीएम बूथमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरावर, चोरी करताना रेकॉर्ड होऊ नये या उद्देशाने काळ्या रंगाचा स्प्रे मारला. आणि त्यानंतर गॅस कटरच्या साह्यानं एटीएम मशीन फोडले. त्यानंतर एटीएममधील कॅश डिस्पेन्सरमधली एकूण 7 लाख 96 हजार 400 रुपयांची रक्कम लंपास केली. एटीएममध्ये सुरक्षारक्षक नसल्याने त्यांनी या संधीचा फायदा घेतला.

मोहरमनिमित्त बॅंकेली सुटी नसल्याने बॅंकेला कळाले नाही : मोहरमनिमित्त बँकेला सुटी असल्याने दुपारपर्यंत ही घटना लक्षात आली नव्हती. त्यानंतर एटीएममध्ये कॅश भरणाचे कॉन्ट्रॅक्ट असणाऱ्या, इपीएस या कंपनीचे रिजनल मॅनेजर यांना एटीएम फुटल्याचा संशय आला. त्यांनी कंपनीचे कर्मचारी इराप्पा मेलकरी यांना एटीएम चेक करण्यास सांगितले. त्यांनी एटीएम चेक केले असता घटना समोर आली आहे.


पोलिसांत दिली तक्रार : या प्रकरणी अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. इराप्पा मेलकरी यांनी या विरोधात फिर्याद दिली आहे. खेड शिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : Tata Mumbai Marathon तीस वर्षे धावल्यावर मुख्यमंत्री झालो, एकनाथ शिंदे यांची तुफान फटकेबाजी

Last Updated : Aug 11, 2022, 2:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details