महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून एकाची हत्या, आरोपीचा शोध सुरू

नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन नेहरू नगर परिसरात पूर्वीच्या भांडणातून एकाने दारूच्या नशेत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. देवदर्शन बाळू मेश्राम (वय 45 वर्षे), असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर सुरज विलास बागडे (वय 25 वर्षे), असे आरोपीचे नाव आहे.

हुडकेश्वर पोलीस
हुडकेश्वर पोलीस ठाणे

By

Published : Oct 12, 2021, 9:17 AM IST

Updated : Oct 12, 2021, 10:12 AM IST

नागपूर -शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन नेहरू नगर परिसरात पूर्वीच्या भांडणातून एकाने दारूच्या नशेत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. देवदर्शन बाळू मेश्राम (वय 45 वर्षे), असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर सुरज विलास बागडे (वय 25 वर्षे), असे आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी सुरज हा पळून गेला असल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मृत देवदर्शन बाळू मेश्राम यांचा पोल्ट्रीफॉर्म व्यवसाय आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या शेजारी राहणारा सुरज बागडे हा या न त्या कारणाने देवदर्शन यांच्याशी वाद घालत होता. ज्यामुळे देवदर्शन यांनी सुरज विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. रविवारी (दि. 10) रात्रीही सुरजने देवदर्शनशी वाद घातला. तेव्हा देवदर्शन हे सुरजला समजावण्यासाठी त्याच्या घरी गेले असता सुरजने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी देवदर्शन यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसात तक्रार केल्याने आरोपी सुरज होता नाराज

सुरज बागडे हा देवदर्शन मेश्रामसह रोज वाद घालत होता. ज्यामुळे देवदर्शन यांनी सुरजची तक्रार जरीपटका पोलीस ठाण्यात केली होती. त्यामुळे सुरज आणखीच संतापला होता. त्याच रागातून सुरजने देवदर्शन यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

हेही वाचा -भाडेकरुच्या धमक्यांना त्रासून घरमालकाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येपूर्वी तयार केला व्हिडीओ

Last Updated : Oct 12, 2021, 10:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details