औरंंगाबाद - मध्यप्रदेशातून उदरनिर्वाहासाठी आलेल्या दौलताबाद परिसरातील ( laborer murder in Auragnabad ) करोडी येथे आलेल्या ३३ वर्षीय मजूराचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी ( 7 मे ) उघडकीस आली. वैलास वियांगसिंग निगवाले (वय ३३, रा.केलपाणी, जि.सेंधवा, मध्यप्रदेश, ह.मु.करोडी) असे खून झालेल्या मजूराचे नाव आहे.
खूनाची माहिती कळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दौलताबाद पोलीस ठाण्यात ( Dauladabad Police case ) अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैलास वियांगसिंग निगवाले असे खून झालेल्या ( brutal murder of a MP laborer ) मजूराचे नाव आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याच्या ( Aurangabad crime news ) सुत्रांनी दिली.
दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करोडी येथे वैलास निगवाले हा तरुण गेल्या काही दिवसासाठी उदरनिर्वाहासाठी आला होता. शनिवारी सकाळी वैलास निगवाले हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही बाब त्याच्या झोपडीजवळ राहणाऱ्या इतर मजूरांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुनिता मिसाळ या आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचल्या.