महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

British Woman Molested : संतापजनक.. मुंबईत ब्रिटिश महिलेचा विनयभंग.. आरोपी अटकेत - विनयभंग करणारा आरोपी अटकेत

मुंबईच्या वांद्रे भागात एका ब्रिटिश महिलेचा विनयभंग करण्यात आला ( British Woman Molested ) आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात ( Bandra Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपीला अटक केली ( Accused Arrested For Molesting Woman ) आहे.

Bandra Police Station
वांद्रे पोलीस ठाणे

By

Published : May 6, 2022, 11:00 AM IST

Updated : May 6, 2022, 12:08 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात एका ४४ वर्षीय ब्रिटीश महिला नागरिकाचा विनयभंग ( British Woman Molested ) करण्यात आला असून, याप्रकरणी विनयभंग प्रकरणी ३५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली ( Accused Arrested For Molesting Woman ) आहे.


क्लबमध्ये केली छेडछाड : मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा ब्रिटीश दूतावासात काम करणारी महिला तिच्या पती आणि मित्रांसह क्लबमध्ये गेली होती. महिला वॉशरुममध्ये गेल्यावर 35 वर्षीय आरोपीने तिचा विनयभंग केला. त्यानंतर ती महिला तिच्या टेबलावर परतली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या पती आणि मित्रांना सांगितला, त्यानंतर त्यांनी आरोपीकडे धाव घेतली आणि त्याला पकडले," पोलीस अधिकाऱ्याने जोडले. त्यावेळी आरोपी घनश्याम यादव हा महिलेला अयोग्यरित्या स्पर्श करत होता, महिलेने आधी दुर्लक्ष केले, सतत असे कृत्य केल्यानंतर महिलेने विरोध केला मात्र तरीही ते मान्य झाले नाही.

अन् आरोपी अटकेत : त्यानंतर महिलेने याबाबत तक्रार करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल नंबरवर कॉल केला. कॉल मिळताच, जवळच्या वांद्रे पोलीस स्टेशन ( Bandra Police Station ) घटनास्थळी पोहोचले, त्यांनी आरोपी घनश्याम यादव याला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४,५०९ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपी एमबीए पदवीधर आणि व्यावसायिक आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Molesting Minor Girl : वसईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मौलानाला नागिरकांनी चोप देत केले पोलिसांच्या स्वाधीन

Last Updated : May 6, 2022, 12:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details