पुणे - बिबवेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड ( Bibwewadi, Pune ) करुन दहशत माजवणाऱ्या टोळीला पोलिसांनी बारा तासांच्या आत जेरबंद केले आहे. हत्येचा प्रयत्न करणे, वाहनांची नासधूस करणे आणि दहशत माजवण्याचे प्रकार या टोळीकडून सुरू होते. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी ( Bibwewadi Police ) 12 तासांच्या आतच या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काकडे वस्ती येथे राहणारा अमिर खान तसेच शेळके वस्तीत राहणारा सुरज कोळी व अकाश कोळी यांचे जून, 2021 पासून वाद सुरू होते. 13 डिसेंबर रोजी अमिरचा वाढदिवस होता. त्यावेळी सुरज कोळी हा त्यांच्या साथिदारांसह अमिरच्या वाढदिवस ज्या ठिकाणी साजरा करण्यात येणार होता त्या ठिकाणी पोहोचत हल्ला चढवला. त्यावेळी अमिर व त्याचे मित्र त्या ठिकाणाहून पळून गेले. त्यानंतर त्याच दिवशी सात्री साडे अकराच्या सुमारास अमिर हा त्याच्या मित्रांसह शेळके वस्तीत सुरज कोळीला मारण्यासाठी गेला. मात्र, सुरजचे घर माहित नसल्याने अमिर व त्याच्या साथिदारांनी परिसरातील वाहनांची तोडफोड ( Pune Crime ) सुरू केली.