महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 4, 2022, 6:04 PM IST

ETV Bharat / crime

Police Arrest Robbers : वकिलाच्या बंगल्यात सशस्त्र दरोडा टाकणारे दरोडेखोर गजाआड

ठाणे येथील एका वकिलाच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा (Armed Robbery at Lawyer Bungalow) पडल्याची घटना २ मार्च रोजी घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोरांनी वृद्ध महिलेच्या गळ्यावर सुरा (Old woman Knife Point) ठेवत अंगावरील दागिन्यांची लूट केली होती. या प्रकरणी भिवंडी पोलिसांना 3 दरोडेखोरांना अटक (3 Robbers Arrested) करण्यात यश आले आहे.

Bhiwandi Police Arrest Robbers
भिवंडी पोलिसांकडून दरोडेखोरांना अटक

ठाणे : एका वकिलाच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना २ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोरांनी बंगल्यातील वृद्ध महिलेच्या गळ्यावर सुरा ठेवत अंगावरीलही दागिन्यांची लूट केली होती. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात (Nizampur Police Precinct) अज्ञात दरोडेखोरांविरोधात पोलिसांचा तपास सुरू असताना, ३ दरोडेखोरांना अटक करण्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले (Bhiwandi Crime Branch Police) आहे. उमेश दशरथ घाटाळ, आकाश कैलास घाटाळ, राहुल खानखोडे असे अटक दरोडेखोरांची नावे आहे.

सहायक पोलीस आयुक्त सुनील वडके

कार्यलयात दरोड्यानंतर बंगल्यात लूटमार : अ‍ॅड. अजय हे आपल्या पत्नी मुलासह एका खोलीत तर त्यांची आई नंदा व सहा वर्षांची मुलगी ही दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. दरोडेखोरांनी पहिल्या मजलावरील घराकडे वळवला, तेथे आई नंदा झोपलेल्या खोलीत शिरले व त्यांच्या गळ्यावर सुरा ठेवत कानातील कर्णफुले खेचून काढली, तर गळ्यातील गंठण व हातातील बांगड्या हिसकावून घेतले. आजीने त्यांना घाबरून, मला मारू नका, तुम्हाला काय न्यायचे ते न्या, असे ओरडून (The old woman screamed) सांगितले.

ग्रामस्थांवर दगड भिरकावीत दरोडेखोरांचे पलायन : वृद्ध सासूचा आवाज ऐकून त्यांची सून उठल्याने व तिनेही घरात काही व्यक्ती आल्याचे पाहून जोरजोरात चोर चोर म्हणून आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील नागरिक उठविण्यास सुरवात केल्याने दरोडेखोरांनी पलायन केले. त्यावेळी काही युवकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सोबत रस्सीने बांधून आणलेले दगड ग्रामस्थांवर भिरकावित पलायन केले.

दरोडेखोर सीसीटीव्ही फुटजेमुळे गजाआड : घटनेच्या दिवशी दरोडेखोर बंगल्याच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला असता गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, दरोडेखोर शहापूर तालुक्यातील रहिवासी असून यामधील राहुल नावाचा दरोडेखोर एका ठिकाणी येणार असल्याची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर त्याला सापळा रचून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ३ ते ४ साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याची माहिती दिली. त्यानंतर २ जून रोजी गुन्ह्यातील उमेश व आकाश यांनाही अटक केली.

दागिन्यांचा शोध सुरू :अटक आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली एक विना नंबर प्लेटची दुचाकी जप्त केली. मात्र, दागिन्यांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे या दरोडेखारांनी या पूर्वी पडघा, शहापूर, मोखाडा भागात दरोडा टाकल्याची पोलिसांना कबुली दिली असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुनील वडके यांनी दिली आहे.





हेही वाचा :मुंबईत दरोडा टाकण्यासाठी दिल्लीहून आलेल्या तिघांना पिस्तुलांसह अटक

ABOUT THE AUTHOR

...view details