अहमदनगर -अहमदनगर ( Ahmednagar ) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोट्यवधी रुपयांचे बाजारमूल्य असलेले हस्तीदंत अर्थात हत्तीचे दात जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात 6 तस्करांना पोलिसांनी (Police to smugglers ) अटक केली आहे. औरंगाबाद महामार्गावर ( Aurangabad Highway ) जेऊर टोलनाका येथे हस्तीदंतांची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी टोलनाका परिसरात सापळा रचला होता. सापळा रचून पोलिसांनी व्यंकटेश दुरईस्वामी ( वय- 40 ) हल्ली रा. वाकोडी फाटा, दरेवाडी, ता. जि. अहमदनगर, महेश बाळासाहेब काटे ( वय- 30 ) रा. आखेगांव, ता. शेवगांव, महेश भगवान मरकड( वय- २६) रा. गहिलेवस्ती, ता. शेवगांव, सचिन रमेश पन्हाळे ( वय- 33 ) रा. आखेगांव, ता. शेवगांव, निशांत उमेश पन्हाळे ( वय- 25 ) रा.भगतसिंग चौक, शेवगांव, संकेश परशुराम नजन ( वय- 23 ) रा. पवारवस्ती शेवगांव अशा 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.