महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Aghori Puja Pune Crime अघोरी पूजा करीत पत्नीला करायला लावली सर्वांसमोर आंघोळ, पुण्यातील धक्कादायक प्रकार - Pune Ambegaon Crime Case

पुण्यातील आंबेगाव परिसरात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. घरामध्ये सुख, शांती नांदावी, भरभराट व्हावी, पुत्रप्राप्ती व्हावी याकरिता पत्नीला रायगडला नेऊन अघोरी पूजा करीत Performing Aghori Puja सर्वांसमोर अंघोळ Bath in Front of Everyone करायला लावली. पत्नीने या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांच्यावर 2013 पासून अत्याचार होत असल्याचे Case Registered in Bharti University Police Station in Pune पोलिसांना सांगितले.

Pune Crime Case
पुण्यातील धक्कादायक घटना

By

Published : Aug 22, 2022, 12:52 PM IST

Updated : Aug 23, 2022, 9:04 AM IST

पुणे पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. घरामध्ये सुख, शांती नांदावी, भरभराट व्हावी म्हणून पती, सासू, सासरे यांनी अघोरी पूजा करीत सुनेला सर्वांसमोर Performing Aghori Puja आंघोळ करायला Bath in Front of Everyone लावली आहे. या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पती, सासू, सासरे, मांत्रिक यांच्या विरोधात गुन्हा Case Registered in Bharti University Police Station in Pune दाखल करण्यात आला आहे.

अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार


पतीने संगनमताने केली पत्नीची फसवणूक अत्याचार करी पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तित्यावर 3 मे 2013 पासून आतापर्यंत अत्याचार होत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या सर्व प्रकारात पतीनेदेखील त्याच्या आई वडील आणि मांत्रिक यांच्या संगममताने पत्नीवर अत्याचार करीत तिची फसवणूक केली आहे. तसेच, धक्कादायक बाब म्हणजे घरात तसेच व्यवसायात भरभराटी यावी, घरामध्ये सुख, शांती नांदावी, भरभराट व्हावी व पत्नीवरील भानामती नाहीशी व्हावी आणि पुत्रप्राप्ती होण्यासाठी फिर्यादीला रायगडला नेऊन सर्वांसमोर अंघोळ करायला लावली.

सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल याबाबत पती शिवराज कोरटकर वय ३६ रा. सदनिका क्र. ९०३ कात्रज आंबेगाव, सासरे राजेंद्र कोरटकर वय ६४, सासू चित्रालेखा, मांत्रिक मौलाना बाबा जामदार वय ६२ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पती, सासरे, सासूला पोलिसांनी अटक केली असून, मांत्रिक अजूनही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. घरामध्ये सुख, शांती नांदावी भरभराट व्हावी व पत्नीवरील भानामती नाहीशी व्हावी आणि पुत्रप्राप्ती होण्यासाठी फिर्यादीला रायगडला नेणून सर्वांसमोर अंघोळ करायला लावली.

पत्नीचे शारीरिक व मानसिक शोषण फिर्यादी पत्नी हिला आरोपी पती यांनी कुटुंबासह संगनमत करून पत्नीचे शारीरिक व मानसिक शोषण करून वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादीचे आई वडिलांनी लग्नामध्ये दिलेले सोन्याचे हिन्याचे व चांदिचे दागिने पत्नीने पतीकडे विश्वासाने ठेवण्यास दिलेले असताना आरोपी पती यांने त्या दागिन्यांचा परस्पर अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली. तसेच फिर्यादीच्या नावावर असलेल्या फ्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेत ठेवून त्यावर बनावट स्वाक्षरी करुन बँकेकडून ७५ लाख रु कर्ज काढले. फिर्यादीला मारहाण करून सासरवाडीकडून एक ते दोन कोटी रुपये व्यवसायासाठी आणायला लावले. त्याची परतफेडसुद्धा न करता सासरवाडीच्या मंडळींची फसवणूक केली. हा सगळा प्रकार पुण्याच्या आंबेगाव परिसर घडला आहे.

हेही वाचा Common University Entrance Eligibility Test देशातील सामायिक विद्यापीठ प्रवेश पात्रता परीक्षेच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात

Last Updated : Aug 23, 2022, 9:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details