महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Spiritual Leader Murder : अफगाणी धर्मगुरू खून प्रकरण; सुफी बाबाची माया अचंबित, पोलिसांची महत्त्वाची माहिती - जरीफ बाबा चिस्ती

येवला येथील चिंचोडी गावातील ( Chinchodi village ) एमआयडीसी ( MIDC ) परिसरात गोळ्या झाडून हत्या ( killed ) करण्यात आली होती. याप्रकरणी फरार हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून, गुन्हे शोध पथकासह 3 पथके हल्लेखोरांच्या मागावर आहे. आतापर्यंत पोलिसांनी 6 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अफगाणी धर्मगुरू खून प्रकरण
अफगाणी धर्मगुरू खून प्रकरण

By

Published : Jul 10, 2022, 12:28 PM IST

नाशिक -नाशिकच्या ( Nashik Crime ) येवला येथे अफगाणी सुफी जरीफ बाबा चिस्ती यांच्या खून प्रकरणात 6 संशयित आरोपी ( Accused ) निष्पन्न झाले आहेत. संपत्तीच्या वादातून बाबांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी ( Nashik Police ) वर्तवला आहे. 4 वर्षांपूर्वी भारतात आलेल्या 29 वर्षीय जरीफ बाबांनी 3 कोटींची माया जमावल्याचे समोर आले आहे.

अफगाणी धर्मगुरू खून प्रकरणी पोलिसांची महत्त्वाची माहिती

जरीफ बाबा चिस्ती याची 5 तारखेला येवला येथील चिंचोडी गावातील ( Chinchodi village ) एमआयडीसी ( MIDC ) परिसरात गोळ्या झाडून हत्या ( killed ) करण्यात आली होती. याप्रकरणी फरार हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून, गुन्हे शोध पथकासह 3 पथके हल्लेखोरांच्या मागावर आहे. आतापर्यंत पोलिसांनी 6 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. चिस्ती बाबा हे जंगम मालमत्तेचे व्यवहार अन्य स्थानिक सेविकारांच्या नावे करत होता, आणि यातूनच बाबांचा घात झाला आहे.

यू-ट्युब कडून मिळत होते लाख रुपये -चिस्ती बाबांच्या यू- ट्यूब वरील व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लोकांकडून पसंती मिळू लागल्याने यु ट्यूब कडून बाबांना लाखो रुपये महिन्यासाठी मिळत होते. बाबांच्या यू- ट्यूब चॅनलवर सुमारे 2 लाखाहून अधिक फॉलोवर्स आणि 1 लाख इतके सबस्क्राईब आहेत. मागील वर्षी यू- ट्यूब कडून त्यांना प्रमाणपत्र व सन्मानपत्र देण्यात आल होत. जाफिर बाबा यांनी हत्येच्या एक दिवस आधी 4 तारखेला भाविकांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तेथील भेटीचा व्हिडिओ हा त्यांच्या यू-ट्युब वरील अखेरचा व्हिडिओ ठरला आहे.

बाबाची माया -अवघ्या 29 वर्ष चिस्ती बाबा यांनी 4 वर्षांपूर्वी भारतात स्थलांतर केले आहे. ते निर्वासित म्हणून, भारतात आश्रयास होते. चिस्ती यांनी सुमारे 3 कोटी रुपयांची संपत्ती जमवल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. मात्र, ते निर्वासित असल्यामुळे त्यांना स्वतःच्या नावावर कुठलीही प्रॉपर्टी घेता येत नसल्याने त्यांनी जंगम मालमत्तेचे व्यवहार स्थानिक सेवेकरांच्या नावे ते करत होते.

बाबाची पार्श्वभूमीवर -चिस्ती बाबा आणि त्याची पत्नी हे मूळ अफगाणिस्तानची नागरिक आहेत. सुफी संत असल्याचा दावा सोशल मीडियावर करत होते. चिस्ती बाबा हे दीड वर्षापासून नाशिकच्या सिन्नर जवळ वावी येथे वास्तवला होते. मात्र, ते कधीही नाशिक शहरात फिरकले नाहीत. ते जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आपला राबता वाढवत होते.

व्हिडिओत प्रसिद्ध सिने अभिनेत्यांच्या फोटोचा वापर -चिस्ती आणि त्यांची पत्नी ही दोघेही अफगाणी असल्यामुळे ते स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी घेऊ शकत नव्हते. त्यामुळे जवळच्या ओळखीतल्या लोकांच्या नावावर त्यांनी प्रॉपर्टी घेतली होती, आणि याच वादातून त्यांची हत्या झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या समोर येत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे फॉलोवर्स मोठ्या प्रमाणात होते. त्याचे उत्पन्नही त्यांना चांगला मिळत होतो. या फोटोमध्ये भारतातील काही प्रसिद्ध सेने अभिनेत्यांचे फोटो सुद्धा त्यांनी वापरल्याच दिसून येत आहे. या संशयित एका व्यक्तीला ताब्यात घेतल आहे, तो या व्हिडिओचा एडिटिंग करत होता असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा -Maharashtra Rain Update : पुढच्या २४ तासांसाठी मुंबई अलर्टवर, हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details