शिर्डी (अहमदनगर)-कोरोनानंतर आता पुन्हा शिर्डीत गुन्हेगारी (Crime In Shirdi) डोके वर काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज पहाटे शिर्डीतील नगर -मनमाड महामार्गावरील खासगी कार पार्किंगमध्ये शिर्डीतील सुरज ठाकूर (Suraj Thakur Injured) नामक युवकावर अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याने परिसरात मोठी खळबळ उडालीय.
Firing In Shirdi : शिर्डीत युवकावर गोळीबार, एक गोळी घुसली छातीत - शिर्डी पोलिस
कोरोनानंतर हळू-हळू पूर्वपदावर येत असलेल्या शिर्डीत गावठी कट्ट्यातून गोळीबार (Firing In Shirdi) करण्यात आला आहे. या गोळीबारात सुरज ठाकूर नामक (Suraj Thakur Injured In Firing) युवक जखमी झाला आहे. त्याच्या छातीत एक गोळी घुसलेली असून, एक गोळी पोटाला घासून गेली आहे.
सुरजवर उपचार सुरू
शिर्डीतील नगर - मनमाड महामार्गालगत (Ahmednagar Manmad Highway) असलेल्या प्रायव्हेट कार पार्किंगमध्ये शिर्डीतील सुरज ठाकूर नामक युवकाला पाहाटे 3 वाजण्याचा सुमारास काही अज्ञात लोकांनी फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर सुरजवर गोळीबार आरोपी करून फरार झाले आहेत. या घटनेची माहिती शिर्डी पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सुरजला शिर्डी साईबाबा संस्थानच्या (Shirdi Sai Baba Trust) साईबाबा रुग्णालयात (Sai Baba Hospital) उपचारासाठी दाखल केले. सुरजवर गावठी कट्यातून गोळीबार करण्यात आला असून, सुरजच्या पोटाला एक गोळी घासून गेलीय तर, दुसरी गोळी छातीत लागली असल्याची माहिती मिळत आहे. सध्या सुरजची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.