महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वसई-रमेदी येथे गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आली 'स्वागतयात्रा'

रामवाडीरामवाडी विभागातील नागरिकांनी एकत्र येत नववर्षानिमित्त आयोजित या शोभयात्रेमध्ये 'रुद्र तांडव' हे ढोल-ताशा पथक प्रमुख आकर्षण ठरले.

By

Published : Apr 6, 2019, 6:01 PM IST

Updated : Apr 6, 2019, 10:01 PM IST

शोभायात्रा

वसई- रमेदी येथे गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रा समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. वसई दत्त मंदिर, रमेदी ते वसई पारनाका असे मार्गक्रमण करीत ही शोभायात्रा पार पडली.

रामवाडी विभागातील नागरिकांनी एकत्र येत नववर्षानिमित्त आयोजित या शोभयात्रेमध्ये 'रुद्र तांडव' हे ढोल-ताशा पथक प्रमुख आकर्षण ठरले. त्याचप्रमाणे पारंपरिक लेझीम पथक, लाठी-काठी पथक आदीही या शोभायात्रेचे आकर्षण ठरले. या शोभायात्रेमध्ये एक हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. त्याचबरोबर शोभायात्रेत निरनिराळ्या सामाजिक, पौराणिक व्यक्तिरेखा असलेले तसेच सामाजिक संदेशाचे देखावे शोभायात्रेत होते.

Last Updated : Apr 6, 2019, 10:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details