ठाणे :गेले अनेक दिवस नाराजी नाट्य संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे . शिवसैनिक मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदेंना समर्थन देत आहेत. जे समर्थन देतील त्यांची हकालपट्टी पक्ष नेतृत्वाकडून करण्यात येत आहे . मात्र आता युवासेनेला (Yuvasena joined Shinde group) देखील गळती लागली असून, ठाणे जिल्ह्याप्रामाने अनेक युवासैनिक हे एकनाथ शिंदे (Dr Srikanth Shinde) यांच्या गटात सामील होत आहेत. ठाण्यातील युवासेनेचे मुख्य पदाधिकारी नितीन लांडगे (NITIN LANDGE) यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने युवासेनेला मोठें खिंडार पडले आहे.
शिवसेनेपाठोपाठ युवासेनेला देखील खिंडार; खासदार श्रीकांत शिंदे महाराष्ट्र दौरा करणार - डॉ श्रीकांत शिंदे
शिवसैनिक मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदेंना समर्थन देत आहेत. जे समर्थन देतील त्यांची हकालपट्टी पक्ष नेतृत्वाकडून करण्यात येत आहे . मात्र आता युवासेनेला (Yuvasena joined Shinde group) देखील गळती लागली असून, ठाणे जिल्ह्याप्रामाने अनेक युवासैनिक हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. ठाण्यातील युवासेनेचे मुख्य पदाधिकारी नितीन लांडगे (NITIN LANDGE) यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने युवासेनेला मोठें खिंडार पडले आहे. तर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr Srikanth Shinde) महाराष्ट्र दौरा करणार आहे
शिवसेने प्रमाणे युवासेना देखील दिवसेंदिवस पोकळ होत आहे . आता महाराष्ट्रातील सर्व युवासैनिकांना शिंदे गटात सामील करण्यासाठी, लवकरच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे महाराष्ट्र दौरा करणार आहे. हा दौरा नरेश म्हस्के, पुर्वेष सरनाईक यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या संपूर्ण यात्रेत शिंदे गटाकडून सर्व महाराष्ट्रातील तरुणांना शिंदे गटाकडे येण्याचे आव्हान करण्यात येणार आहे. मात्र आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत, असे शिंदे गटातील पूर्वेष सरनाईक यांच्या कडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे आमची युवासेनेतून हकालपट्टी केली तरीही, आम्ही युवासैनिक आहोत असे सरनाईक यांनी देखील सांगितले . तसेच एकनाथ शिंदे यांच्या विचारांना समजून घेण्यात संभ्रम होता; म्हणून प्रवेश करण्यास उशीर झाला, असे नितीन लांडगे यांनी सांगितले.
हेही वाचा :MH Political Crisis : धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे निवडणूक आयोगासमोर आमनेसामने