ठाणे - साखरपुडा होऊन लग्न करायला मुलीने नकार दिल्याने नैराश्यातून एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुरेश वामन घुडे, असे गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
साखरपुडा होवूनही मुलीचा लग्नास नकार, नैराश्यातून तरुणाची आत्महत्या ! - Umbarpada sucide
मृताच्या नातेवाईकांनी मुलीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुरेश घुडे हा मुरबाड तालुक्यातील उंबरपाडा - सरळगाव येथे कुटुंबासह राहत होता. काही दिवसांपूर्वीच सुरेशचा साखरपुडा झाला होता. मात्र अचानक मुलीने लग्नाला नकार दिल्याने सुरेश निराश झाला. या नैराश्याच्या भरातच त्याने घरातच गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र मृताच्या नातेवाईकांनी मुलीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.