महाराष्ट्र

maharashtra

Youth Rescued From Ship : येमेनमध्ये हायजॅक झालेल्या जहाजावरून कल्याणमधील तरुणाची सुटका, पंतप्रधानांचे मानले आभार

By

Published : Apr 30, 2022, 12:46 PM IST

मध्य आशियाई देशातील येमेन ( Ship hijack yemen Kalyan youth rescue ) येथील हौती बंडखोरानी एक मालवाहू ( Youth rescued from ship hijacked in Yemen ) जहाज हायजॅक केला होता. या जहाजावर नोकरीला असलेल्या कल्याणमधील एका तरुणाची ( Mohammad Munnavar rescued from ship hijacked ) साडेतीन महिन्यानंतर सहीसलामत सुटका झाली आहे.

Youth rescued from ship hijacked in Yemen
मोहम्मद मुन्नवर सुटका येमेन

ठाणे -मध्य आशियाई देशातील येमेन ( Ship hijack yemen Kalyan youth rescue ) येथील हौती बंडखोरानी एक मालवाहू ( Youth rescued from ship hijacked in Yemen ) जहाज हायजॅक केला होता. या जहाजावर नोकरीला असलेल्या कल्याणमधील एका तरुणाची ( Mohammad Munnavar rescued from ship hijacked ) साडेतीन महिन्यानंतर सहीसलामत सुटका झाली आहे. रमजान महिन्यात हा तरुण घरी परतल्याने त्याच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात ( Ship hijacked Kalyan youth rescue ) पडला आहे. मोहम्मद मुन्नवर, असे सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे.

माहिती देताना मोहम्मद मुन्नवर

हेही वाचा -Suicide Of Married woman : प्रियकराच्या छळाला कंटाळून विवाहित प्रेयसीची आत्मह्त्या

राजकीय संघर्षातून जहाज हायजॅक - कल्याण पश्चिम परिसरातील गोविंदवाडीमध्ये राहणारा मोहम्मद मुन्नवर हा आखाती देशातील खालीद फरज ( Kalyan youth rescue news Yemen ) या शिपिंग कंपनीच्या मालवाहू जहाजावर डेक केडर पदावर कार्यरत होता. त्यातच गेल्या काही वर्षांपासून येमेनचे सौदी आणि संयुक्त अमिरात यांच्यासोबत राजकीय संघर्ष सुरू आहे. या संघर्षात हौती बंडखोरांनी खालीद फरज या शिपींग कंपनीचे मालवाहू जहाज हायजॅक केले.

मोदी सरकारचे मानले आभार - हायजॅक केलेल्या जहाजावर मुन्नवर कार्यरत असल्याने त्याची आई बेनजीर आणि बहीण अलीजा यांची चिंता वाढली होती. मुन्नवरचे काय होणार, या चिंतेने त्यांना दिवसरात्र झोप नव्हती. मात्र, भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यावर हायजॅक करण्यात आलेल्या जहाजावरून मुन्नवरच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. मुन्नवरची जहाजावरून सुटका झाली. कल्याणला घरी सुखरूप परतल्याने मुन्नवरने व त्याच्या आईने मोदी सरकारचे आभार मानले.

हेही वाचा -किरकोळ भांडणातून शेजाऱ्याने चिमुकल्याचे अपहरण करून केली हत्या; आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक

ABOUT THE AUTHOR

...view details