ठाणे - लग्न सोहळ्यानिमित्ताने आयोजित केलेल्या एका हळदी समारंभात डीजेच्या तालावर नाचताना 25 वर्षीय तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
हळदी समारंभात नाचताना 25 वर्षीय तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - हळदी सभारंभात नाचताना 25 वर्षीय तरूणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
हळदी समारंभात डीजेच्या तालावर नाचता नाचता 25 वर्षीय तरूणाला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरशद असलम शेख (२५) असे मृतक तरुणाचे नाव आहे.
ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नं.३ येथील ओटी सेक्शन परिसरातील एका हळदी सभारंभात घडली. याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरशद असलम शेख (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.
उल्हासनगर कॅम्प नं.३ येथील ओटी सेक्शन परिसरातील आशिर्वाद सोसायटीमध्ये मृत अरशद असलम शेख कुटुंबासह राहत होता. मृत अरशद हा याच परिसरातील एका लग्न सोहळ्यानिमित्ताने हळदी समारंभ ठेवण्यात आला. या हळदी समारंभात डीजेच्या तालावर नाचत असताना त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी त्वरीत मध्यवर्ती शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अकस्मत मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरक्षक वाजे करत आहेत.