ठाणे :-Tinder आणि JAUMO सारखे सोशल मिडीया ॲपचा वापर करत हनी ट्रॅपच्या माध्यमातून तरूणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. सबंधित टोळी ही टिंडर या ॲपवरून सुरूवातीला ओळख वाढवत शरिरसुखाचं प्रलोभन देत होती. अशा प्रकारे ओळखी करत सबंधित तरूणाला नियोजित स्थळी बोलावून त्याला दमदाटी आणि मारहाण करत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैसे उकळले जात होते. आत्तापर्यंत या प्रकरणात ६ जणांना अटक केली गेली असून अद्यापही तपास सुरू आहे.
ठाण्यात हनी ट्रॅपमध्ये अडकवून केली तरुणांची फसवणूक - etv bharat maharshtra
Tinder आणि JAUMO सारखे सोशल मिडीया ॲपचा वापर करत हनी ट्रॅपच्या माध्यमातून तरूणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. सबंधित टोळी ही टिंडर या ॲपवरून सुरूवातीला ओळख वाढवत शरिरसुखाचं प्रलोभन देत होती.
या ब्लॅकमेलिंग प्रकरणात आरोपींमध्ये ३ महिलांचा देखील समावेश आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना काळात ऑनलाईन सेक्सॅार्टिझम आणि हनी ट्रॅपसारख्या प्रलोभनांना बळी पडू नये असे आवाहनही ठाणे पोलिसांनी केले आहे.
गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदार नाही
हा प्रकार ब्लॅकमेलिंगचा असल्यामुळे या प्रकरणांमध्ये पोलिसांनी तपास केल्यानंतर तक्रारदार पुढे येत नव्हते. कारण समाजात होणारी बदनामी टाळण्यासाठी अनेक पीडित घाबरून पुढे येत नव्हते. मात्र, पोलिसांनी मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तक्रारदार पुढे आले आणि त्यावर पुढे कारवाई झाली आहे.
हेही वाचा -छोट्या चिमुरडीला दारू पाजून नऊ वर्षीय मुलीवर बापानेच केला अत्याचार! पाहा व्हिडिओ...