ठाणे - प्रत्येक व्यक्तीने एकतरी झाड लावून ते जगवले तर आपला देश सुजलाम सुफलाम होईल, असा संदेश आषाढी एकादशीनिमित्त एका युवा प्रतिष्ठानाने दिला आहे. ठाण्यातील युवा प्रतिष्ठान ने लाडू आणि तुळशीची रोपे वाटून एकादशीचा सण साजरा केला.
तुळशीचे रोपे व लाडू वाटून साजरा केला आषाढी एकादशीचा उत्सव; ठाण्यातील युवकांचा उपक्रम - लाडू
ठाण्यातील युवा प्रतिष्ठानने लाडू आणि तुळशीची रोपे वाटून एकादशीचा सण साजरा केला. यावर्षी प्रतिष्ठानने जवळपास 500 तुळशीच्या रोपांचे व लाडूंचे वाटप भाविकांना केले.
ठाण्यातील लोकमान्यनगर येथील विठ्ठल मंदिरात भाविकांनी पहाटे पासून मोठी गर्दी केली होती. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास होतो आहे. त्यामुळे नापिकीमुळे होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे प्रयत्न प्रत्येक नागरिकांनी केले पाहिजेत. झाडे लावून जागवली पाहिजेत असे संस्थेचे अध्यक्ष सागर भोसले यांनी सांगितले.
यावर्षी प्रतिष्ठानने जवळपास 500 तुळशीच्या रोपांचे व लाडूंचे वाटप भाविकांना केले. हणुमंत जगदाळे, पुष्कराज विचारे, संदीप पाचंगे तसेच राकेश इंदिसे सारख्या नव्याजुन्या राजकीय व इतर क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी मंदिराला भेट देऊन विठू रख्माईचे मनोभावे दर्शनही घेतले.