महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कशेळी खाडीत तरुणाने मित्राला मोबाईलवरून सूचना देऊन केली आत्महत्या - narpolice police station

कशेळी खाडीत ४० वर्षीय स्वप्नील शांताराम तळगावकर याने खाडीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

suicide
suicide

By

Published : Jun 1, 2021, 7:02 PM IST

ठाणे -सोमवारी संध्याकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास कशेळी खाडी, बॉम्बे ढाबा, मुंबई नाशिक महामार्ग, अंजूर दिवा या ठिकाणी ४० वर्षीय स्वप्नील शांताराम तळगावकर याने खाडीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल , टीडीआरएफ, कळवा पोलीस आणि नारपोली पोलीस उपस्थितीत होते. तरुणाचा मृतदेह शोध कार्य सुरु करण्यात आले. मंगळवारी चार वाजण्याच्या सुमारास स्वप्नील याचा मृतदेह सापडला. आपत्ती व्य्ववस्थापनाने मृतदेह नारपोलीस पोलिसांच्या स्वाधीन केला. १२ तासानंतर मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले.

हेही वाचा -पुणे जिल्ह्यातील यवत गावच्या हद्दीतील प्रसिद्ध कांचन हॉटेलला लागली आग

सोमवारी ५.४५ वाजण्याची घटना आहे. मृत स्वप्नील तळगावकर(४०) हा खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. मुंबई नाशिक महामार्गावर तरुणाने खाडीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची अफवा पसरली आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम, अग्निशमन दल ,टीडीआरएफ टीम, नारपोली आणि कळवा पोलिसांच्या उपस्थितीत तळगावकर याला शोधण्याचे काम सुरु करण्यात आले. तळगावकर हा गणेश नगर दिवा येथील रहिवाशी असून तो कल्याण येथे खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. दरम्यान स्वप्नील तळगावकर याने खाडीत उडी घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी मित्र रोहित गायकवाड याला मोबाईलवर आत्महत्या करीत असल्याचे कळविले आणि कशेळी खाडीत उडी घेतली. अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक आज आणि तपासात समोर आलेली आहे. अग्निशमन दलाने आणि टीडीआरएफ दलाने एक रेस्क्यू व्हेन आणि एका बोटीच्या सहाय्याने मंगळवारी सकाळपासून शोध कार्य सुरु केले ते संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तळगावकर याचा मृतदेह पथकाला सापडला. त्याचा मृतदेह हा नारपोली पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती अधिकारी यांनी दिली.

दुसरीकडे मृतक स्वप्नील तळगावकर याने आत्महत्या करण्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्याने मित्र रोहित गायकवाड याला काय सांगितले याबाबतही अद्याप माहिती समजू शकलेली नाही. अधिक तपास पोलिसांच्या मार्फत करण्यात येत आहे.

हेही वाचा -म्युकरमायकोसिसवर उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय रुई येथे स्वतंत्र कक्षाची स्थापना

ABOUT THE AUTHOR

...view details