महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बेलापूर स्थानकाजवळ लोकलमध्येच तिघांकडून एकास मारहाण - new mumbai crime

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पनवेलच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये बेलापूर ते खारघर स्थानकादरम्यान एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलायं.

thane railway news
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पनवेलच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये बेलापूर ते खारघर स्थानकादरम्यान एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलायं.

By

Published : Feb 19, 2020, 6:54 PM IST

नवी मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पनवेलच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये बेलापूर ते खारघर स्थानकादरम्यान एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या आधी देखील अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र ट्रेनमधील अन्य प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मारहाण करणाऱ्या तिघांना खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पनवेलच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये बेलापूर ते खारघर स्थानकादरम्यान एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलायं.

छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल रेल्वेमध्ये हा प्रकार घडला असून संबधित तरुण काल सायंकाळी आठच्या सुमारास प्रवास करत होता. या तरुणाला बेलापूर रेल्वे स्थानकावर उतरायचे होते. मात्र, ट्रेनच्या दारात उभ्या असणाऱ्या तीन प्रवाशांनी बेलापूर आल्यानंतर त्याला उतरण्यासाठी जागा दिली नाही. यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली; आणि यानंतर या तीन तरुणांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र इतर प्रवाशांनी मारहाण करणाऱ्या तीन तरुणांना खारघर रेल्वे स्थानकावर उतरवून पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील कारवाई पनवेल रेल्वे पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details