ठाणे :योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांचावर नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आहे. लोकशाहीत लोक ज्यांच्यावर विश्वास व्यक्त करतात ते नेते असतात. त्यांच्याबद्दल आम्ही नेहमीच आदर आणि प्रेम व्यक्त केला आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त ( Sanjay Raut On Yogi Adityanath ) केली. आज देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधताना 'तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, असे विधान केले ( Devendra Fadnavis Criticized Shivsena ) होते. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून संजय राऊत यांनी 'तुम्ही म्हणजे देश नाही', अशा शब्दात टीका केली ( Sanjay Raut On Devendra Fadnavis ) आहे.
Sanjay Raut Replied Fadnavis : 'तुम्ही म्हणजे देश नाही'.. संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले - काँग्रेस पक्षाला भूगोल राहिला नाही
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर बोलताना तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मुंबई नाही', असं वक्तव्य केलं ( Devendra Fadnavis Criticized Shivsena ) होत. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना 'तुम्ही ( भाजप ) म्हणजे देश नाही', अशा शब्दात सुनावले ( Sanjay Raut On Devendra Fadnavis ) आहे.
![Sanjay Raut Replied Fadnavis : 'तुम्ही म्हणजे देश नाही'.. संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले 'तुम्ही म्हणजे देश नाही'.. संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14837161-thumbnail-3x2-raut.jpg)
काँग्रेसने भूगोल वाढवावा : काँग्रेस पक्षाला इतिहास आहे. त्यांचा फक्त भूगोल राहिलेला नाही. त्यांनी आता भूगोल वाढवला पाहिजे. उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांच्या निवडणुका पाहिल्या तर काँग्रेस पक्षाने आपली ताकद वाढवावी. तरच 2024 साली समर्थ पर्याय उभा राहील. काँग्रेस पक्ष हा फक्त कादंबरी पुरताच मर्यादित राहिला आहे, असे ठाण्यातील एका कादंबरी प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी खासदार संजय राऊत बोलत ( Sanjay Raut On Congress ) होते.
संजय राऊत यांनी मधेच सोडला कार्यक्रम : ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये मधू मंगेश कर्णिक यांच्या 'प्राप्तकाल' या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी संजय राऊत आले होते. त्यांच्या सोबत भालचंद्र मुणगेकरही अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी परिसंवाद देखील आयोजित करण्यात आला होता. हा परिसंवाद सुरू असताना मुणगेकर यांनी 15 टक्के मुस्लिम समाजाला कसलीही भीती वाटत नाही. मग हिंदूंना का वाटते? हा विषय सुरू असताना संजय राऊत उठले आणि त्यांनी कार्यक्रमातून रजा घेतली.