महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बदलापूरमध्ये अश्लील संभाषण करणाऱ्याला महिलांनी भररस्त्यात बदडले; व्हिडिओ व्हायरल - thane news

रॉंग नंबरचा फायदा घेऊन आरोपी गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात राहणाऱ्या काही महिलांशी मोबाईलवरून अश्लील संभाषण करून त्यांची छेड काढत होता. सातत्याने हा प्रकार घडत असल्याने बदलापूरमधील या महिला चांगल्याच धास्तावल्या होत्या. अखेर आपल्या मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने या विकृतीचा शोध घेऊन त्याला अलिबागवरून पकडून बदलापुरात आणून चांगला बदडला आहे.

thane
viral video

By

Published : Dec 1, 2019, 7:21 PM IST

Updated : Dec 1, 2019, 10:13 PM IST

ठाणे- मोबाईलवरून महिलांची अश्लील संभाषण करून छेड काढणाऱ्या विकृत तरुणाला बदलापूरमधील महिलांनी भर रस्त्यात बदडल्याची घटना समोर आली आहे. विकास कुमार मेवालाल असे भरस्त्यात बदडलेल्या विकृत तरुणाचे नाव आहे.

महिलांशी अश्लील संभाषण करणाऱ्याला भररस्त्यात बदडतानाचा व्हायरल व्हिडिओ


महिलांनी चोप देतानाचा हा सगळा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका रॉंग नंबरचा फायदा घेऊन हा विकृत गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात राहणाऱ्या काही महिलांशी मोबाईलवरून अश्लील संभाषण करून त्यांची छेड काढत होता. सातत्याने हा प्रकार घडत असल्याने बदलापूरमधील या महिला चांगल्याच धास्तावल्या होत्या. अखेर आपल्या मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने या विकृतीचा शोध घेऊन त्याला अलिबागवरून पकडून बदलापुरात आणून चांगला बदडला आहे.


त्यांनतर विकृत आरोपीला बदलापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याच्यावर सध्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, महिलांची छेड काढण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका घेण्याची मागणी आता महिला वर्गाकडून केली जात आहे.

Last Updated : Dec 1, 2019, 10:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details