ठाणे -महिला प्रथम या प्रथेप्रमाणे भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे एका वाईन शॉपबाहेर चक्क महिलांनी दारू खरेदीसाठी रांग लावली होती. दारू खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलांना दारू कोणासाठी? अशी विचारणा केली असता बहुतांश महिलांनी नवऱ्यासाठी दारू खरेदी करत असल्याचे सांगितले. तर काही महिलांना इतर तळीरामांनी पैशाचे आमिष दाखूवन दारू खरेदीसाठी रांगेत उभे केल्याचे सांगण्यात आले.
येथेही 'लेडीज फर्स्ट'.. 'या' ठिकाणी वाईन शॉपबाहेर दारू खरेदीसाठी महिलांची रांग - liquor
सार्वजनिक ठिकाण आणि कार्यक्रमांमध्ये महिलांना प्राधान्य देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. याच प्रथेप्रमाणे की काय, 'लेडीज फर्स्ट' म्हणून चक्क वाईन शॉप बाहेरही दारू खरेदीसाठी महिलांनी रांग लावल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे तळीरामांच्या आधी दारू विक्रेत्यांनी खरेदीसाठी रांगेत असलेल्या या महिलांना प्राधान्य दिले होते.
लॉकडाऊनमुळे देशासह राज्याच्या आर्थिक चक्राला ब्रेक लागला होता. त्यावर उपाय म्हणून राज्यातील तळीरामांचा घसा ओला करण्याचा पर्याय सरकारने स्विकारला. त्यामुळे तिसऱ्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर राज्यात ठिकठिकाणी वाईन शॉपचे सशर्त शटर उघडण्यात आले. दारू दुकाने सुरु होण्याच्या अगोदरच अनेक ठिकाणी तळीरामांनी दारू खरेदीसाठी रांगा लावल्याचे पहायला मिळाले. तर बहुतांश वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचेही दिसून आले. त्यानंतर काहीकाळ पुन्हा बंदी घालण्यात आली. परंतु, राज्याला महसूलाची गरज असल्याने राज्य सरकारने काही अटी आणि शर्थीनुसार पुन्हा वाईन शॉप उघडण्यास परवानगी दिली आहे.
हेही वाचा...गाव दिसू दे गा देवा..! मुंबईसह उपनगरातील लाखो मजुरांचा गावाच्या दिशेने पायी प्रवास