महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धावत्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म - Woman delivers in train

एका गरोदर मातेने धावत्या एक्सप्रेसमध्येच गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.

धावत्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये गरोदर महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म
धावत्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये गरोदर महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

By

Published : May 27, 2021, 6:05 PM IST

ठाणे -मुंबईहून गीतांजली एक्सप्रेसने मूळ गाव असलेल्या कोलकाताला जाणाऱ्या एका गरोदर मातेने धावत्या एक्सप्रेसमध्येच गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही माय लेकाची प्रकृती उत्तम आहे.


सकाळीच निघाले होते मूळ गावी
मुंबईतील गोरेगाव परिसरात राहणारे राजाबाबू दास हे आपल्या गरोदर पत्नीसह आपल्या मूळ गावी कोलकाता येथे जाण्यासाठी आज सकाळी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेसमध्ये प्रवासाला निघाले होते. त्यावेळी गीतांजली एक्सप्रेसने कल्याण रेल्वे स्थानक सोडल्यावर ट्रेन खर्डी रेल्वे स्थानक सोडून कसाराकडे येत असताना उबंरमाळी ते कसारा रेल्वे स्थानका दरम्यान राजाबाबू यांची गरोदर पत्नी रुमा यांना पोटात त्रास होऊन प्रसूती काळ येत होत्या. या दरम्यान ट्रेनमधील काही महिला सहप्रवाशांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत कसारा रेल्वे स्थानक आले. कसारा स्थानकात उतरून राजाबाबू या प्रवाशाने कसारा रेल्वे पोलिसांना मदतीसाठी विनंती केली. कर्तव्य बजावत असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचारी अतुल येवले, महिला पोलीस कर्मचारी पूनम हाबळे, रेल्वे सुरक्षा बल दलातील महिला कर्मचारी स्वाती मेश्राम यांनी तात्काळ गीतांजली एक्सप्रेसमध्ये असलेल्या गरोदर मातेकडे धाव घेतली. तो पर्यंत ती गरोदर माताची प्रसूती झाली होती.

कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रातून लगेच डिचार्ज
महिला पोलिसांनी दक्षता घेत त्या महिलेला रेल्वे डब्यातून सुखरूप खाली उतरवले. प्रसूती झालेल्या महिलेच्या मदतीसाठी कसारा रेल्वे स्थानका जवळील देऊळवाडी येथील अंजना डोंगरे, भागीरथी भगत, कविता डोंगरे, मोहिनी भगत, पार्वती डोंगरे या महिलांनी तात्काळ कसारा रेल्वे स्थानकात धाव घेत प्रसूत महिलेच्या बाळाचे पुढील सोपस्कर पार पाडीत तिची सुटका केली. प्रसंगावधान राखीत रेल्वे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका खासगी गाडीतून महिला व बाळ यांना तात्काळ कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी देवेंद्र वाळुंज यांनी महिलेवर तात्काळ उपचार सुरु केले. माता व बाळ यांची प्राथमिक तपासणी व उपचार करून त्यांना डिचार्ज देण्यात आला.

माय लेकाची प्रकृती उत्तम
प्रसंगवधान राखीत रेल्वे पोलीसानी स्थानिक महिलांची मदत घेऊन प्रसूत महिलेची व बाळाची सुखरूप सुटका करून तिला पुढील वैद्यकीय उपचारासाठी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details