महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

घटस्फोट का देत नाही, म्हणून पत्नीच्या प्रियकराचा युवकावर हल्ला, गुन्हा दाखल - ठाणे क्राइम न्यूज मराठी

काल दुपारच्या सुमारास भिवंडी-ठाणे मार्गावरील राहनळ गावाच्या हद्दीतील भर रस्त्यावर जितेंद्रला गाठून ‘तू तुझ्या बायकोला घटस्फोट का देत नाही’, असे बोलून वाद घातला. या वादानंतर आरोपी भावांनी अचानक लाकडी दांडक्याने प्रहार करून जितेंद्रला खाली पाडले. जितेंद्र रस्त्यावर पडताच कैचीने वार केले.

thane crime
thane crime

By

Published : Oct 8, 2021, 7:05 PM IST

ठाणे - बायकोला घटस्फोट देत नसल्याच्या वादातून बायकोच्या प्रियकराने भावाच्या मदतीने भर रस्त्यात अडवून नवऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी-ठाणे मार्गावरील राहनळ गावाच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दोघा हल्लेखोर भावांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जगनाथ भगत, अभिमन्यू भगत असे हल्लेखोर भावाचे नावे आहेत. जितेंद्र पाटील (वय ३८) असे हल्ल्यात गंभीर जखमी नवऱ्याचे नाव आहे.

लाकडी दांडक्यासह कैचीने वार

जखमी नवरा आणि गुन्हा झालेले दोघेही भाऊ भिवंडी तालुक्यातील डुंगे गावात राहतात. त्यातच गेल्या दोन वर्षापासून पती-पत्नीमध्ये सोडचिठ्ठी देण्यावरून वाद सुरू होते. अशातच काल दुपारच्या सुमारास भिवंडी-ठाणे मार्गावरील राहनळ गावाच्या हद्दीतील भर रस्त्यावर जितेंद्रला गाठून ‘तू तुझ्या बायकोला घटस्फोट का देत नाही’, असे बोलून वाद घातला. या वादानंतर आरोपी भावांनी अचानक लाकडी दांडक्याने प्रहार करून जितेंद्रला खाली पाडले. जितेंद्र रस्त्यावर पडताच कैचीने वार केले.

खासगी रुग्णालयात दाखल

जितेंद्र यामध्ये गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांनतर नारपोली पोलीस ठाण्यात दोघा भावांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षिक विकास राऊत करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details