ठाणे -परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आले आहे मात्र अजूनही त्यांना अटक का होत नाही, असा सवाल नाशिक ग्रामीणचे उपअधीक्षक शाम कुमार निपुंगे यांनी केला आहे. निपुंगे म्हणाले की, छोट्या लोकांना आरोप सिद्ध होताच अटक केली जाते मात्र उच्चपदी असणाऱ्या अधिकाऱ्यांना राजकीय वरदहस्त असल्याने हात लावला जात नाही. परमबीर सिंग यांना ज्याची हत्या करायची असते त्याआधी ते पीडिताकडून सुसाईड नोट लिहून घेतात, असा आरोपही यावेळी निपुंगे यांनी केला आहे. माझा काटा काढण्यासाठी परमबीर सिंग यांनी महिला पोलीस कर्मचारी सुभद्रा पवार यांची हत्या करून आत्महत्या दाखवल्याचा प्रकार असल्याचे निपुंगे यांनी म्हटले आहे.
लुकआऊट नोटीस असतानाही परमबीर सिंगांना अटक का नाही?, उपाधीक्षक शाम कुमार निपुंगे यांचा सवाल - परमबीर सिंग
परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आले आहे मात्र अजूनही त्यांना अटक का होत नाही, असा सवाल नाशिक ग्रामीणचे उपअधीक्षक शाम कुमार निपुंगे यांनी केला आहे. परमबीर सिंग यांना ज्याची हत्या करायची असते त्याआधी ते पीडिताकडून सुसाईड नोट लिहून घेतात, असा आरोपही यावेळी निपुंगे यांनी केला आहे.
![लुकआऊट नोटीस असतानाही परमबीर सिंगांना अटक का नाही?, उपाधीक्षक शाम कुमार निपुंगे यांचा सवाल -parambir-singh-not-arrested-after-lookout-notice-](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12810345-thumbnail-3x2-parambeer.jpg)
ज्यांची हत्या करायची त्यांच्याकडून सुसाईड नोट लिहून घेणे त्यांची स्टाईल -
एकदा पोलीस शिपाई हवालदार आणि पीएसआय असेल तर त्याला गुन्हा दाखल झाल्यावर लागलीच अटक होते. मात्र हेच एखाद्या बड्या अधिकाऱ्याबाबत का होत नाही, असा सवाल निपुंगे यांनी केला आहेत. 2017 साली सुभद्रा पवार या महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे आणि याच प्रकरणात मला गुंतवून पूर्ववैमनस्यातून मला अडकवण्यात आले, असे निपुंगे यांनी सांगितले आहे ठाणे न्यायालयात या संदर्भात खटला सुरू आहे. न्यायालयात निपुंगे यांनी सुभद्रा पवार यांच्या पोस्ट मोर्टमच्या वेळी त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते. मात्र न्यायालयात ठाणे पोलिसांनी आता हे रेकॉर्डिंग उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे परमबीर सिंग हे पुरावे नष्ट करण्याचे काम करतात, असा आरोपही निपुंगे यांनी केला आहे.
परमबीर सिंग यांना आतापर्यंत अटक न करण्याचे कारण काय, उशिराने लूक आऊट नोटीस का काढली, असे सवाल निपुंगे यांनी विचारले असून कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. हे दाखवून देण्यासाठी त्यांच्यावर अटकेची कारवाई करून कायदा हा सर्वात मोठा असल्याचे दाखवून देण्याचे आवाहन निपुंगे यांनी सरकार आणि न्याय व्यवस्थेला केले आहे.