महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

परमबीर सिंग यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी; ही नोटीस म्हणजे काय ? जाणून घ्या.. - Look out notice information news

ठाण्याचे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसची प्रक्रिया सुरू असल्यामुळे लूक आऊट नोटीस म्हणजे नेमके काय? याबाबत ठाणे न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करीत असलेले अ‌ॅड. राजूरकर यांनी माहिती दिली.

Look out notice information advocate Rajurkar
लूक आऊट नोटीस माहिती अ‌ॅड. राजूरकर

By

Published : Aug 14, 2021, 4:45 AM IST

ठाणे -सध्या ठाण्यात लूक आऊट नोटीसबाबत मोठा गाजावाजा सुरू आहे. ठाण्याचे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसची प्रक्रिया सुरू असल्यामुळे लूक आऊट नोटीस म्हणजे नेमके काय? याबाबत ठाणे न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करीत असलेले अ‌ॅड. राजूरकर यांनी माहिती दिली.

माहिती देताना अ‌ॅड. ओंकार राजूरकर

हेही वाचा -चॉकलेट व सौंदर्य प्रसाधनाने भरलेला टेम्पो, कंटेनर चोरीप्रकरणी 5 आरोपींना अटक

पोलिसांमार्फत एखाद्या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीचा सुगावा सापड नसल्याने त्याला अटकाव करण्यासाठी आणि देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्याकडून लूक आऊट नोटीस बजावण्यात येते. नोटीस बजावल्यानंतर देशाबाहेर जाणाऱ्या वाहतूक यंत्रणांच्या इमिग्रेशन विभागाला एक प्रकारे ऑथोरिटीच्या माध्यमातून पळून जाऊ इच्छिणाऱ्या आरोपीला अटकाव करण्याचे अधिकार बहाल करणे म्हणजेच लुकआऊट नोटीस होय, अशी माहिती अ‌ॅड. राजूरकर यांनी दिली.

अ‌ॅड. राजूरकर पुढे म्हणाले की, लुकआऊट नोटीस देण्यामागचे कारण असे की, आरोपी ज्या गुन्ह्यात आहे. त्या गुन्ह्यात त्याची कस्टडी घेऊन चौकशी करून सबळ पुरावे तयार करायचे असतात. मात्र, आरोपी पळून गेल्यास किंवा देश सोडून गेल्यास आरोपी विरोधात कुठलाही गुन्हा सिद्ध करण्यात अनेक अडचणी निर्माण होतात आणि फिर्यादीला न्याय देता येत नसल्याने फरारी आरोपीच्या विरोधात पोलीस लूक आऊट नोटीस काढून इतर यंत्रणांना सतर्क करीत असतात. ही प्रक्रिया अजिबात किचकट नसून गुन्हेगाराला अटकाव करण्यासाठी या नोटीसचा वापर पोलीस करतात.

जर आरोपी पळाला तर कठीण

जर लूक आऊट नोटीस नंतर किंवा आधी अशा प्रकारचा आरोपी देशाबाहेर गेला तर त्याचा परिणाम संपूर्ण खटल्यावर होतो. त्यामुळे, न्याय मिळणे कठीण होऊन बसते. जो पर्यंत आरोपी न्यायालयाच्या समोर येत नाही, तो पर्यंत तो खटला प्रलंबित राहतो, म्हणून लूक आऊट नोटीस जशी गरजेची आहे, तसे आरोपी मिळणे देखील खूप आवश्यक आहे. जर तो आरोपी पळाला तर काहीच करता येऊ शकत नाही. फार फार तर त्याच्या मालमत्तेवरती टाच आणता येऊ शकते, अशी माहिती अ‌ॅड. राजूरकर यांनी दिली.

हेही वाचा -मतदारांना पर्याय म्हणून आम आदमी पक्ष निवडणुकीच्या मैदानात; 'आप'च्या प्रदेश अध्यक्षांचे वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details