महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मीरारोड, भाईंदर स्थानकांत लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा नाही - पश्चिम रेल्वे प्रशासन

खासदार विचारे यांनी मीरारोड भाईंदर स्थानकात लांब पल्याच्या गाड्याना थांबण्याची मागणी केली. मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी तितकी नसून अद्याप थांबणे अश्यक्य असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

विचारे
विचारे

By

Published : Dec 24, 2020, 10:25 PM IST

Updated : Dec 24, 2020, 10:54 PM IST

मीरा भाईंदर - खासदार राजन विचारे यांची रेल्वे प्रशासनासोबत बैठक पार पडली. यामध्ये खासदार विचारे यांनी मीरारोड भाईंदर स्थानकात लांब पल्याच्या गाड्याना थांबण्याची मागणी केली. मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी तितकी नसून अद्याप थांबणे अश्यक्य असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबाव्या ही मागणी

खासदार राजन विचारे व रेल्वे प्रशासन यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. यामध्ये अनेक विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून गुजरात, राजस्थान या राज्यात जाणाऱ्या गाड्या थांबाव्या, ही मागणी होत असताना बैठकीत खासदार विचारे यांनीदेखील ही मागणी केली आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या सध्या गाड्या मीरारोड व भाईंदर स्थानकात थांबवू शकत नाही. लवकरच रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला जाईल. सदरचे अधिकार रेल्वे बोर्डाला आहेत, असे रेल्वे प्रशासनाने बैठकीत स्पष्ट केले आहे.

बोरिवली ते विरारमध्ये सहा लाइनचे काम सुरू

बोरिवली ते विरार दरम्यान एमवीआरसीच्या माध्यमातून सहा लाइनचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात बोरिवली, दहिसर, मीरारोड, नायगाव, वसईला मंजुरी मिळाली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील भाईंदर नालासोपारा व विरारपर्यंतचा आराखडा एमआरव्हीसीमार्फत मान्यतेसाठी पश्चिम रेल्वेस प्राप्त झालेला नाही. प्राप्त झाल्यास मान्यता देऊ, असे रेल्वेने कळवले आहे.

स्थानकावरील होर्डिंग्स स्थलांतर होणार

दोन्ही रेल्वे स्थानकातील पादचारी पूल, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकते जिने, लिफ्ट, तिकीट खिडकी, एटीव्हीएम मशीन, रेल्वे स्थानकातील फेऱ्या, शौचालय, सुरक्षेसाठी बसविलेले सीसीटीव्ही यावर भर देऊन वाढविण्यात येतील असे रेल्वे प्रशासनाने कळविले. मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानके झाकली गेली असून नागरिकांना अडथळा ठरत आहेत ती दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी वारंवार करूनसुद्धा रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा सवाल यावेळी विचारे यांनी केला. त्यावर बाधित ठरणारी सर्व होर्डिंग्स काढून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केली जातील, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

Last Updated : Dec 24, 2020, 10:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details