ठाणे -ठाण्यात येत्या शुक्रवारी सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 या कालावधित काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहराला स्टेम वॉटर कंपनीकडून पाणीपुरवठा होतो. मात्र काही दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाण्यात पाणीपुरवठा राहणार दोन दिवस बंद - Thane latest news
ठाण्यात येत्या शुक्रवारी सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 या कालावधित काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, कासारवडवली, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा इत्यादी भागाचा पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी रात्री 9 ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत सिद्धेवर, जॉहन्सन, समतानगर, इनर्निटी, जेल परिसर, ऋतुपार्क, साकेत, कळव्याच्या काही भागांत पाणीपुरवठा बंद असणार आहे. तसेच पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.