ठाणे- महानगरपालिका स्टेम प्राधिकरण यांच्यामार्फत होणारा पाणीपुरवठा त्यांच्या अत्यावश्यक विविध दुरूस्तीच्या कामाकरिता शुक्रवार सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यत 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी शुक्रवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, कासारवडवली, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा व मुंब्रा या ठिकाणचा पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहील.
शुक्रवारी घोडबंदर रोड, मुंब्रा परिसरात पाणीपुरवठा राहणार बंद - शुक्रवारी घोडबंदर रोड पाणीपुरवठा बंद
ठाणे पालिका प्राधिकरण यांच्यामार्फत होणारा पाणीपुरवठा त्यांच्या अत्यावश्यक विविध दुरूस्तीच्या कामाकरिता शुक्रवार सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यत 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिका
तसेच रात्री 9 शनिवार सकाळी 9 वाजेपर्यत सिद्धेश्वर तलाव, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी, जेल परिसर, साकेत, ऋतुपार्क इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहणार आहे. वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दोन दिवस कमी दाबान पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांना पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.