नवी मुंबई - ठाणे-बेलापूर रस्त्याजवळील कोपर खैराणे येथील महानगरपालिकेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे पालिकेच्या माध्यमातून या जलवाहिनीची त्वरित दुरुस्ती केल्याची माहिती नवी मुंबई पालिका प्रशासनाने दिली.
ठाणे-बेलापूर रस्त्यारील जलवाहिनी फुटली;नागरिकाच्या सतर्कतेमुळे त्वरित दुरुस्ती - BMC pipeline latest news
ठाणे-बेलापूर मार्गावरील कोपरखैरणे पुलाजवळ महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. या रस्त्यावरून जाणाऱ्या सौरभ पांड्या नामक व्यक्तीच्या संबंधित बाब लक्षात आल्याने त्यांनी तत्परतेने महानगरपालिका प्रशासनाला कल्पना दिली.
ठाणे-बेलापूर मार्गावरील कोपरखैरणे पुलाजवळ महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते.
ठाणे-बेलापूर मार्गावरील कोपरखैरणे पुलाजवळ महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. या रस्त्यावरून जाणाऱ्या सौरभ पांड्या नामक व्यक्तीच्या संबंधित बाब लक्षात आल्याने त्यांनी तत्परतेने महानगरपालिका प्रशासनाला कल्पना दिली.
कोपरखैरणे येथील मुख्य जलवाहिनी संदर्भात आम्ही संबधित विभागाला माहिती दिली असून, या फुटलेल्या जलवाहिनीची त्वरीत दुरुस्ती करण्यात आल्याचे पालिका उप-अभियंता प्रशांत देशमुख यांनी सांगितले.