ठाणे - ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. पालिका प्रशासनाने बहुरचनिय प्रभाग पद्धतीनुसार जो प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला होता तो अंतिम करण्यात आला आहे . विशेष म्हणजे आज मंगळवारी निवडणूक प्रभागांच्या सीमा प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Thane Municipal Corporation election 2022) यामध्ये शहारत ६ नगरसेवक वाढले आहेत. तर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात एकूण ४ आणि दिवा येथे १ नगरसेवक वाढवण्यात आले आहे.
गेल्या निवडणुकीत सुमारे ५६ हजार लोकसंख्येचा १ या प्रमाणात ३२ प्रभागांची रचना
ठाणे महापालिकेत सध्या १३१ नगरसेवक आहेत २०१२ ची महापालिकेची निवडणूक २००१ च्या जनगणनेनुसार झाली होती. (Ward structure of Thane) तसेच, येणारी महापालिका निवडणूकही २०११ च्या जनगणनेनुसारच होणार आहे. २००१ साली ठाणे शहराची लोकसंख्या १२ लाख होती ती वाढून ती २०११ च्या जनगणनेत अधिकृतपणे १८ लाख ४१ हजार ४८८ झाली आहे. गेल्या निवडणुकीत सुमारे ५६ हजार लोकसंख्येचा १ या प्रमाणात ३२ प्रभागांची रचना करण्यात आली होती.
दिवा परिसरात ५ नगरसेवक वाढणार
दिवा परिसरात ४७ हजार लोकसंख्येसाठी वार्डांचा एक प्रभाग असे एकूण १३१ नगरसेवक असे चित्र होते. तर या निवडणुकीत ठाण्यात ११ नगरसेवक वाढले आहेत. प्रभागांची संख्या ४७ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शहरात ९० तर शहराबाहेर कळवा मुब्रा आणि दिवा परिसरात ५ नगरसेवक वाढणार असून त्यातही दिवा परिसरात १ तर कळव्यात चार नगरसेवकांचा एक नवा प्रभाग वाढणार आहे.