महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

निर्माल्यापासून मिळवा मोफत खत, ठाण्यातील विवियाना मॉलचा स्तुत्य उपक्रम - ganesh visarjan news in thane

ठाण्यातील विवियाना मॉलने एक नामी शक्कल लढवली आहे. लोकांनी आपल्याकडे निर्माल्य घेऊन यावे, यासाठी त्यांनी "निर्माल्य द्या, नैसर्गिक खत घ्या" ही योजना सुरू केली आहे.

निर्माल्य गोळा करताना विवियाना मॉलचे कर्मचारी

By

Published : Sep 12, 2019, 10:29 PM IST

Updated : Sep 12, 2019, 11:55 PM IST

ठाणे -गणपती विसर्जनादिवशी शेकडो टन निर्माल्य तयार होत असते. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे ही दरवर्षीची डोकेदुखी होऊन बसलेली आहे. हे निर्माल्य पाण्यात टाकले तर पाणी प्रदूषित होते. यामुळे ठाण्यातील विवियाना मॉलने एक नामी शक्कल लढवली आहे. लोकांनी आपल्याकडे निर्माल्य घेऊन यावे, यासाठी त्यांनी "निर्माल्य द्या, नैसर्गिक खत घ्या " ही योजना सुरू केली आहे.

ठाण्यातील विवियाना मॉलच्या उपक्रमाची माहिती देताना कर्मचारी

हेही वाचा - कृत्रिम तलावाचा वापर करा; परळ गाव गणेश मंडळाचे भक्तांना आवाहन

विवियाना मॉलच्या या योजनेला ठाणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा झाले आहे. निर्माल्य देणाऱ्यांना एक कूपन देण्यात येते. या कूपनच्या बदल्यात 20 दिवसांनी खत मिळते. ही एक अत्यंत अभिनव कल्पना असून मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा होत आहे. या निर्माल्यातून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खत निर्मिती करून ती परत लोकांना देण्यात येत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे तलाव, नद्या, खाड्या आणि समुद्रातील प्रदूषण कमी होईल आणि लोकांना फुकटात नैसर्गिक खत मिळेल, असे मॉलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Last Updated : Sep 12, 2019, 11:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details