ठाणे -केंद्र सरकारने काही अटी आणि शर्थी लागू करत सर्व मजूर वर्गाला आपल्या घरी जाण्याची मुभा दिली आहे. स्थानिक डॉक्टर यांच्याकडून फिटनेस प्रमाणपत्र आणि पोलीस स्थानकातून ना हरकत दाखला घेऊनच त्यांना गावी जाता येणार आहे. आज सकाळपासूनच ठाणे पूर्व येथील कोपरी भागात दवाखान्यांबाहेर स्थलांतरितांच्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या.
राज्यभरात लागू असलेल्या संचारबंदीमुळे कोट्यवधी गोरगरीब स्थलांतरित मंजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. 22 मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे या कामगारांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासनाकडून दोन वेळचे अन्न मिळत असले तरी या कठीण समयी कुटुंबापासून दूर राहिल्याने त्यांच्यात नैराश्य आले आहे. मात्र, नियमानुसार स्थलांतरितांना गावी जाण्यासाठी फॉर्म भरून त्यावर डॉक्टरांचा शिक्का घेतला तरच त्यांना गावी जाता येणार आहे. त्यामुळे लोकांनी गर्दी केली होती.