महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'तुमच्यामुळे गावात कोरोना येईल', नागरिकांनी वाईन शॉपसमोर घातला गोंधळ - दारू विक्री भिवंडी तालुका

राज्यात ठिकठिकाणी वाईन शॉप सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, भिवंडी तालुक्यातील येथील अंबाडी गावात 'तुमच्यामुळे गावात कोरोना येईल' असे ग्रामस्थांनी एका वाईन शॉपच्या मालकाला चांगलाच इशारा दिला. तसेच ग्रामस्थांनी काहीवेळ वाईन शॉपसमोर गोंधळ घातल्याने अखेर पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.

Villagers riot in front of liquor shop in Ambadi village Bhiwandi taluka
भिवंडी तालुका अंबाडी गावातील दारू विक्री दुकानासमोर ग्रामस्थांचा गोंधळ

By

Published : May 14, 2020, 7:50 PM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील 'डायमंड वाईन शॉप' येथे मद्य खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडत आहे. विशेष म्हणजे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, वसई, विरार भागातील कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रातून हजारोंच्या संख्येने नागरिक या ठिकाणी दारू खरेदीसाठी धाव घेत आहेत. त्यामुळे अंबाडी गावाला या नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढेल, असा कयास बांधुन स्थानिक कार्यकर्त्यांनी या वाईन शॉप समोर गोंधळ घातला. यावेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना सदर दुकानाचा मालक शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न करता दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

भिवंडी तालुका अंबाडी गावातील दारू विक्री दुकानासमोर ग्रामस्थांचा गोंधळ... पोलिसांनी केली मध्यस्थी...

हेही वाचा...अरे देवा ! अंत्ययात्रेला गेले आणि 98 जण कोरोना पॉझिटिव्ह होऊन आले

काही दिवसापूर्वीच राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात असलेले वाईन शॉप सुरू ठेवण्यास दुकानदारांना परवानगी दिली होती. मात्र, भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील डायमन वाईन शॉपचा मालक शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन न करताच दारू विक्री करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच श्रमजीवी संघटनेने जिल्हा अधिकारी व संबधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अंबाडी परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच अंबाडी आणि झिडके ग्रामस्थ, ग्रामपंचायत पेसा कमिटी यांनी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना मद्यविक्री करण्यास जोरदार विरोध केला होता. त्यामुळे श्रमजीवी संघटनेचे निवेदन आणि स्थानिकांचा आक्रोश पाहता गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून एक बैठक घेतली होती.

कायदा सुव्यवस्था पाळण्याच्या दृष्टीने सदर मद्य विक्री दुकानात स्थानिकांनाच आधारकार्ड पाहून आणि ड्रायव्हिंग लायसन्स पाहून प्रवेश दिला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. तसेच कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधित क्षेत्रांतील नागरिकांना येथे प्रवेश मिळणार नाही. जिल्हा बंदी आणि जमावबंदीचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही आश्वासन पोलिसांनी दिलेले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार, कातकरी घटक प्रमुख जयेंद्र गावित तसेच दोन्ही ठिकाणच्या ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून झिडके येथील मधुकर पाटील, देवराज लाटे, कल्पेश(बाळू)जाधव, अंबाडी येथील अरुण जामदार, सुमित पाठारी, जुनेद धुरू आदी नागरिक या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा...धक्कादायक..! मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

स्थानिकांच्या भावनांचा सन्मान करून नियमात राहूनच परिसरात कोरोना पसरु नये, यासाठी आवश्य त्या सर्व खबरदारीसहीत दारू विक्री केली जाईल, असा निर्णय पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिला होता. या निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, आज (गुरुवार) पुन्हा या वाईन शॉपमधून कोणत्याही नियमांचे पालन न करता दारू विक्री करत असल्याचे समजताच श्रमजीवीचे कार्यकर्ते प्रमोद पवार, कल्पेश जाधव यांनी वाईन शॉपच्या मालकाला चांगेलच धारेवर धरले. तसेच तुमच्यामुळे आमच्या गावात कोरोनाचा शिरकाव होणार असल्याचे त्यांना ठणकावून सांगितले. शासनाच्या नियमांचे पालन करूनच दारू विक्री करा, असे सांगत त्यांनी वाईन शॉप समोर चांगलाच गोंधळ घातला होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत वाईन शॉप मालकाला नियमाचे पालन करतच दारू विक्री करण्यास सुचना केली.

ABOUT THE AUTHOR

...view details