ठाणे -गेली चार दिवस ठाण्यात ऐतिहासिक वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. आज सकाळपासूनच पुन्हा वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली होती. ही कोंडी संध्याकाळपर्यंत तशीच होती. उलट संध्याकाळच्यावेळी वाहनांच्या रांगा वाढताना दिसल्या. वाहनांच्या रांगा या १२ ते १५ किलोमीटर लांबपर्यंत आहेत.
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा हेही वाचा -अबब..! ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वत:चा मास्क माजी मंत्र्यांना घातला, पाहा व्हिडिओ..
- १२ ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा -
मुलुंड चेक नाकापासून ते कल्याण फाटापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गणपती सणासाठी ठाण्यात अवजड वाहनांना बंदी घातली होती. परंतु, गणपती बाप्पाचा सण संपल्यानंतर आता अवजड वाहनांना ठाण्यात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. रस्त्यात खड्डे असल्याने वाहतूक कोंडी अजूनही पाहायला मिळत आहे. या सर्व वाहतूक कोंडीचा फटका मुंबईकर व ठाणेकरांना बसत आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड, नाशिक हायवे, इस्टर्न एक्प्रेस हायवे अशा महत्वाच्या रस्त्यांवर १२ ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आहेत.
ठाण्यात अभूतपूर्व वाहतूक कोंडी - राष्ट्रवादी आंदोलनाच्या तयारीत -
होणारी वाहतूक कोंडी जर प्रशासनाने फोडली नाही तर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा आज राष्ट्रवादीने दिला आहे. दररोजच्या या त्रासाला नागरिक प्रवाशी कंटाळले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी आंदोलनाच्या तयारीत आहे.
ठाण्यात अभूतपूर्व वाहतूक कोंडी हेही वाचा -ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील; सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची सही