ठाणे - प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही अजूनही नियमांचे पालन होत नाही. कल्याण बाजार समितीत नियमांचे उल्लंघन होताना कारवाई करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तसह पथकावर ( Dombivli Municipal Corporation team ) भाजीपाला विक्रेत्यांनी कांद्याने हल्ला केला. त्यांना पिटाळून लावल्याची घटना समोर आली आहे.
महापालिका पथकाशी हुज्जत घालून गोंधळ
कल्याण डोंबिवली महापालिकेचे पथक आज ( 10 जानेवारी ) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्लास्टिकच्या पिशव्यावर कारवाई करण्यासाठी बाजार समितीमध्ये गेले होते. त्यावेळी अचानक विक्रेत्यांनी लाईट बंद करत शिवीगाळ पथकावर कांदे फेकून ( vegetable sellers thrown onions ) मारले. दुसरीकडे या घटनेचा विविध कामगार संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा-Country Corona Update : भारतात कोरोनाचे 1,79,723 तर ओमायक्रॉनचे 4,033 रुग्ण