ठाणे - कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असताना नागरिकांमध्ये मात्र कमालीचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. पालिका पोलीस आणि इतर यंत्रणांमार्फत विविध माध्यमातून सोशल डिस्टनसिंग विषयी सतत जनजागृती होत आहे. मात्र, लोक ठिकठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे कोरोनाच्या संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी जांभळी नाक्यावरील बाजार दोन दिवसांसाठी सेंट्रल मैदानावर हालवण्यात आला. मात्र, लोकांनी त्या ठिकाणी देखील खरेदीसाठी झुंबड केली.
ठाण्यातील घाऊक बाजाराचे विभाजन; गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका प्रयत्नशील - vegetable markets in thane
कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असताना नागरिकांमध्ये मात्र कमालीचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. पालिका पोलीस आणि इतर यंत्रणांमार्फत विविध माध्यमातून सोशल डिस्टनसिंग विषयी सतत जनजागृती होत आहे. मात्र, लोक ठिकठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत.
कोरोनाचा वाढता धोका पाहता आता हा घाऊक बाजार ठाण्यातील चार ते पाच ठिकाणी विभाजित केला जाणार आहे. या विभाजनामुळे गर्दीदेखील विभागली जाईल, असा अंदाज महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांनी व्यक्त केला. कोरोनाचे झपाट्याने वाढणारे संक्रमण थोपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सर्वांनी एकमेकांपासून अंतर ठेवणे हा असून नागरिकांनी बाजारात येऊन आपल्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन त्यांनी केले.
बाजारातील किराणा व्यापाऱ्यांनी दोन व्यक्तींमध्ये किमान पाच फुटाचे अंतर ठेवावे. तसेच नागरिकांनी देखील स्वतः वरच निर्बंध घालून घेतले पाहिजेत, असे ते म्हणाले. घाऊक बाजारातील गर्दी कमी करण्याचा विभाजन हा सद्यपरिस्थितीत एकमेव मार्ग उरल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी हे संक्रमणाचे संकट अतिशय गंभीरतेने घेऊन घरी बसावे. अन्यथा मला हा बाजार नाईलाजास्तव बंद करावा लागेल, असा इशारा सिंघल यांनी ठाणेकरांना दिला आहे.