महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 8, 2020, 2:38 PM IST

ETV Bharat / city

भारत बंदच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडी आक्रमक, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

भारत बंदच्या समर्थनार्थ जिल्हा वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. केंद्रात मंजूर करण्यात आलेला कृषी कायदा रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली निदर्शने करण्यात आली.

ठाणे भारत बंद न्यूज
ठाणे भारत बंद न्यूज

ठाणे - भारत बंदच्या समर्थनार्थ जिल्हा वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. केंद्रात मंजूर करण्यात आलेला कृषी कायदा रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली निदर्शने करण्यात आली.

ठाणे वंचित बहुजन आघाडीची कृषी कायदा रद्द करण्याची मागणी

हेही वाचा -पालघरमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद, दुकाने बाजारपेठा बंद; एसटी, रिक्षा सेवा सुरू

या वेळी, वंचितचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी स्टेशन परिसरात सुरू असलेली दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कायदा रद्द होत नाही, तोवर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

ठाणे : भारत बंदनिमित्त पोलीस बंदोबस्त

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात देशात आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला देशभरातून प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रातही बंद पाळण्यात येत आहे. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा -भारत बंद.. जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प

ABOUT THE AUTHOR

...view details