ठाणे -श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता असलेला वडापाव महागाई वाढल्याने आता महाग ( Vadapav Price Increased ) झालाय. वडा आणि पाव या दोन्ही गोष्टींसाठी लागणारे साहित्य महागल्याने इंधन दरवाढीचा परिणाम म्हणून आता वडापाव दोन रुपयांनी महाग झालाय. यामुळे सामान्यांच्या तोंडातला घास काढून घेतलाय, असे म्हटलं होतं.
गॅस सिलेंडर महागले - दोन ते पाच रुपयांची दरवाढ होण्यामागे वडापाव बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य प्रचंड महाग झाल्याने करण्यात आली आहे. वड्या मधील बटाटा, कोथिंबीर असो किंवा चण्याचे पीठ एवढेच काय तर पाव बनवण्याकरता लागणारा मैदा आणि वडा तळण्याकरता लागणारे तेल गॅस सिलेंडर हे देखील महागले आहे.
ठाण्यातील प्रसिद्ध राजमाता वडापाव येथे रोज हजारो लोक चव चाखण्यासाठी खवय्ये येत असतात. मात्र, सर्वच दरवाढ झाल्यामुळे राजमाता वडापाव यांनी सुद्धा दरवाढ केली आहे. वडापाव खाण्याकरता येणाऱ्या सर्वांनाच दरवाढ का करण्यात आली आहे, याबाबत समजून सांगावे लागते, असे राजमाता वडापावचे मालक निलेश शेट्टी यांनी म्हटले आहे.