महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाप्पाकडे घातले ​साकडे - Urban Development Minister Eknath Shinde

राज्य सरकार टप्याटप्प्याने सर्व उघडत आहे. अचानकपणे सर्व ठिकाणचे उघडे केले तर अधिक संख्या कोरोनाची वाढेल म्हणून सर्वानी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. कोविड संपला तर सर्व ठिकाणी आपण उघडू. टास्क फोर्सच्या तज्ञाच्या मताप्रमाणे आपण हे करत आहे. कोणाला हौस नाही मंदिरे बंद करण्याची असाही टोला विरोधकाला शिंदे यांनी लगावला आहे.

eknath shinde
eknath shinde

By

Published : Sep 10, 2021, 10:48 PM IST

ठाणे -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले आहे. खासदार डॉ श्रीकांत शिंदेसह कुटुंबीयांनी प्राणप्रतिष्ठान करत गणरायाची पूजा अर्चा करण्यात आली. फुलाच्या आरसाची सजावट शिंदे यांच्या घरातील गणरायाच्या ठिकाणी केली आहे.

एकनाथ शिंदेचे बाप्पाकडे साकडे
कोविडचे वातावरण अद्याप देखील आहे. सर्वांची अपेक्षा आहे जे राज्यावरील कोवीडचे संकट आहे ते दूर व्हावे. तिसरी लाट येऊ नये यासाठी राज्य सरकार अनेक आव्हान करत आहे. गर्दी टाळा, मास्कचा वापर करावा असे अनेक नियम आहे. तिसरी लाट न परवडणारी आहे .त्यामुळे ही संकटे विघ्नहर्ता दूर करेल.

मंदिर लवकर उघडणार
राज्य सरकार टप्याटप्प्याने सर्व उघडत आहे. अचानकपणे सर्व ठिकाणचे उघडे केले तर अधिक संख्या कोरोनाची वाढेल म्हणून सर्वानी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. कोविड संपला तर सर्व ठिकाणी आपण उघडू. टास्क फोर्सच्या तज्ञाच्या मताप्रमाणे आपण हे करत आहे. कोणाला हौस नाही मंदिरे बंद करण्याची असाही टोला विरोधकाला शिंदे यांनी लगावला आहे.

शिंदेकडे बाप्पाचे आगमन
आता रुद्रान्श साठी वेळ देणारसामाजिक आणि राजकीय आयुष्यात कुटुंबासाठी वेळ मिळत नसतो. आता एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रान्श हा देखील आरतीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर खेळताना दिसला आहे. आता रुद्रान्श साठी विशेष काढतो आणि पुढे ही काढणार असेही आवर्जून एकनाथ शिंदे यांनी etv भारतशी बोलताना सांगितले आहे.हेही वाचा -पिकविमा कंपन्यांच्या अटी जाचक - राजेश टोपे

ABOUT THE AUTHOR

...view details