महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लोकलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचा निनावी फोन, पनवेल स्टेशनसह रेल्वेची तपासणी

निनावी फोन करणाऱ्या त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच प्रसिद्धी माध्यमांचे छायाचित्रकार त्या ठिकाणी पोहोचले. परंतु त्यांना फोटो काढण्यास मज्जाव करण्यात आला.

लोकलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचा निनावी फोन
लोकलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचा निनावी फोन

By

Published : Mar 15, 2020, 12:54 PM IST

नवी मुंबई - मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून पनवेलकडे आलेल्या लोकल गाडीमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचा रविवारी सकाळी निनावी फोन आला. त्यानुसार बॉम्ब शोधक पथक , अग्निशमन दल, आरपीएफ, लोहमार्ग पोलीस पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्याठिकाणी तपासणी करण्यात आली. परंतु संशयास्पद कोणतीही वस्तू आढळली नाही.

पनवेल रेल्वे स्टेशन

सकाळी नऊ वाजता पनवेल रेल्वे स्थानकाकडे पनवेल रेल्वे स्थानकातील लोकलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचा फोन रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर त्वरित सर्व यंत्रणांना माहिती देण्यात आली. त्यानुसार बॉम्ब शोधक पथक काही मिनिटातच पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवानही तेथे आले. लोहमार्ग आणि आर पी एफ चे कर्मचारी रेल्वे स्थानकावर अगोदरच होते. दरम्यान एक आणि दोन क्रमांकाचे फलाट पूर्णपणे रिकामे करण्यात आले. या ठिकाणी लागलेल्या लोकल गाडीमध्ये तपासणी करण्यात आली. परंतु आत मध्ये काही आढळून आले नाही.

लोकलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचा निनावी फोन, पनवेल स्टेशनसह रेल्वेची तपासणी

निनावी फोन करणाऱ्या त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच प्रसिद्धी माध्यमांचे छायाचित्रकार त्या ठिकाणी पोहोचले. परंतु त्यांना फोटो काढण्यास मज्जाव करण्यात आला. अशाप्रकारे फोन का करण्यात आला किंवा अशी वस्तू खरंच ठेवण्यात आली होती का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. परंतु प्रथम दर्शनीय ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा - Coronavirus : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मुंबईत आढळले आणखी 4 रुग्ण

हेही वाचा - वन्यजीवांसाठी जंगलात उभारले कृत्रीम पाणवठे, वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशनचा उपक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details