महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केंदीय मंत्री कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेचा श्रीगणेशा, ठाणे शहरात जोरदार स्वागत - केंदीय मंत्री कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रा

कपिल पाटील यांनी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जनआशिर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. यामध्ये पाटील यांच ठाणे शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांसह नागिरकांनी जोरदार स्वागत केले आहे. यावेळी पाटील यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार आर्पण करून आशिर्वाद घेतले.

केंदीय मंत्री कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेचा श्रीगणेशा, ठाणे शहरात जोरदार स्वागत
केंदीय मंत्री कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेचा श्रीगणेशा, ठाणे शहरात जोरदार स्वागत

By

Published : Aug 16, 2021, 6:10 PM IST

ठाणे - केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जनआशिर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. यामध्ये पाटील यांच ठाणे शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांसह नागिरकांनी जोरदार स्वागत केले आहे. यावेळी पाटील यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार आर्पण करून आशिर्वाद घेतले.

ठाणे शहरात केंदीय मंत्री कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेचे स्वागत

कोळी गीतांच्या ठेक्यावर नृत्य सादर करून कपिल पाटील यांना शुभेच्छा

ठाण्याच्या वेशीवरून जन यात्रेला जोरदार सुरुवात झाली. ठाण्याचे नगरसेवक भरत चव्हाण आणि संजय वाघुले यांनी ना.कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेचे जोरदार स्वागत केले. यावेळी पारंपारिक वेशभुषेतील आगरी कोळी बांधवांनी कोळी गीतांच्या ठेक्यावर नृत्य सादर करून कपिल पाटील यांच्या यात्रेला शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले

यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. मोदी यांनी संधी दिल्यामुळे आपल्या जिल्ह्याला केंद्रीय मंत्री पदाचा मान मिळाला अस पाटील म्हणाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार या दिग्गज मंडळीच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवार १६ ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details