महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Hawker attack in Mira Bhayandar : ठाण्यात पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांची मुजोरी; पालिका कर्मचाऱ्यावर रॉडने हल्ला

मीरा भाईंदर शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या ( issue of illegal hawkers in Mira Bhayandar ) चव्हाट्यावर आली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या मोठी वाढली आहे. ठाण्यात काही दिवसांपूर्वी पालिकेच्या महिला अधिकाऱ्यांवर फेरीवाल्यांनी चक्क चाकूने हल्ला केला होता. त्याचीच पुनरावृत्ती मीरा भाईंदरमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अनधिकृत फेरीवाल्याची मुजोरी
अनधिकृत फेरीवाल्याची मुजोरी

By

Published : Nov 29, 2021, 3:39 PM IST

Updated : Nov 29, 2021, 3:51 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) -अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेच्या फेरीवाला पथकावर ( hawker attack by rod on corporation employee ) रॉडने हल्ला केला आहे. या घटनेमध्ये एका कर्मचाऱ्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. पालिका फेरीवाला पथक हे भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्ली समोरील बॉम्बे मार्केटमध्ये कारवाई करत असताना हा प्रकरार घडला आहे.

मीरा भाईंदर शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या ( issue of illegal hawkers in Mira Bhayandar ) चव्हाट्यावर आली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या मोठी वाढली आहे. ठाण्यात काही दिवसांपूर्वी पालिकेच्या महिला अधिकाऱ्यांवर फेरीवाल्यांनी चक्क चाकूने हल्ला केला होता. त्याचीच पुनरावृत्ती मीरा भाईंदरमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ठाण्यात पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांची मुजोरी

हेही वाचा-MH Assembly Winter Session : विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक सुरू

हल्लेखोर फेरीवाल्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या पथकावर एका फेरीवाल्यानी चक्क रॉडने ( unauthorized hawker attack on corporation employee ) हल्ला केला. यामध्ये पालिका कर्मचारी गणेश घारे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. तर त्या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी आकाश भगवान पाटील हे मध्यस्थीसाठी गेले. त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. भाईंदर प्रभाग दोनचे फेरीवाला पथक प्रमुख राकेश त्रिभुवन यांच्या तक्रारीवरून ( Police case against unauthorized hawker in Mira Bhayandar police ) भाईंदर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणारा आरोपी अब्दुल रेहमान निजामुद्दीन हाशमी याने पळ काढला होता. भाईंदर पोलिसांनी शिताफीने रात्री उशिरा अटक केली.

हेही वाचा-Parliament Winter Session : सरकार सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार - मोदी

मीरा भाईंदर शहरात महिन्याभरात दोन ठिकाणी फेरीवाल्यांचे हल्ले-
१७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी भाईंदर पूर्वेच्या बीपी रोड परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई दरम्यान पालिका अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये पाच आरोपीना अटकदेखील करण्यात आली. मीरा भाईंदर शहरात महिन्याभरात दोन ठिकाणी फेरीवाल्यांनी हल्ले केले आहेत.

हेही वाचा-Nawab Malik Bail : माजगाव न्यायालयाकडून नवाब मलिक यांना जामीन

Last Updated : Nov 29, 2021, 3:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details