ठाणे - उल्हास नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे उल्हास नदीमध्ये जलपर्णीची पैदास झपाट्याने वाढत आहे. नदीवर जणू हिरवागार गालीचा पसरला आहे. ही नदी नसून एक क्रिकेटचे मैदान आहे की काय? असे वाटत आहे. या हिरव्यागार जलपर्णीमुळे पाणीसाठा घटत असल्याने अखेर लघु पाटबंधारे विभागाच्या आदेशावरून कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, नदीच्या प्रवाहामुळे पुन्हा जलपर्णीचा हिरवा गालीचा जैसे थे असल्याचे दिसून आले आहे.
उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सुरू; नदीच्या प्रवाहांमुळे पुन्हा जलपर्णी जैसे थे - west water
उल्हास नदीतील कल्याण तालुक्यातील मोहिली येथील केंद्रातून कल्याण डोंबिवली महापालिका पिण्यासाठी पाणी उचलते. मात्र, नदीतून वाहत येणारा कचरा, गाळ आणि सांडपाणी या पाण्यात मिसळत असल्यामुळे या नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली आहे.
उल्हास नदीतील कल्याण तालुक्यातील मोहिली येथील केंद्रातून कल्याण डोंबिवली महापालिका पिण्यासाठी पाणी उचलते. मात्र, नदीतून वाहत येणारा कचरा, गाळ आणि सांडपाणी या पाण्यात मिसळत असल्यामुळे या नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली आहे. या जलपर्णीमुळे नदीच्या पाण्याची पातळी घटत असल्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने नदी पात्रातील जलपर्णी काढत नदीपात्र स्वच्छ करण्याचे आदेश या नदीतील पाणी उचलणाऱ्या प्राधिकरणाना दिले आहेत. या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, नदीच्या प्रवाहाबरोबर पुन्हा जलपर्णी वाहत येत असल्यामुळे जितकी जलपर्णी काढली जाते, तितकीच जलपर्णी पुन्हा जमा होत असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे.