ठाणे - मौजमजा करण्यासाठी घरफोडी व मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेला यश आले आहे. याबद्दलची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे. यामध्ये, सराईत चोरट्यांसह एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. दरम्यान, यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुदर्शन प्रल्हाद सकपाळ (वय १८ रा. बदलापूर) ऋतिक शांताराम मालूसरे (वय १८ रा. बदलापूर ) अकबर अली शेख वय ३७, रा. अंबरनाथ) आणि फाहद ईंजिनीयर अन्सारी असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे पथक करीत होते संमातर तपास -गेल्या काही दिवसापांसून उल्हासनगर पोलीस परिमंडळ चार मधील कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी चोरी, मोटर सायकल चोरी, मोबाईल चोरी या दाखल गुन्हयाचा संमातर तपास उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक करीत होते. त्यातच गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून संशयीत आरोपी सुदर्शन प्रल्हाद सकपाळ, ऋतिक शांताराम मालूसरे या दोघांना बदलापूर भागातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, एका अल्पवयीन चोरट्यासह हे त्रिकुट केवळ मौजमजेसाठी धूम स्टाईलने मोबाईलसह घरफोडी व दुचाकी लंपास करीत असल्याची कबुली दिली.